Upset In Test Cricket Point Table File Photo
Sports

Test Cricket Point Table: श्रीलंका- ऑस्ट्रेलियाच्या कसोटीतील विजयामुळे भारताला फटका, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Upset In Test Cricket Point Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने कसोटी विजय मिळवताच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फरक पडला आहे. मात्र भारताचं मोठं नुकसान झालं आहे.

Bharat Jadhav

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५- २०२७ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आता ९ संघांमध्ये लढत सुरू आहे. प्रत्येक कसोटी सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसतेय. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि बांग्लादेश हे संघ कसोटी सामने खेळलेत. या सहा संघांमध्ये कसोटीच्या चार सामन्यानंतर गुणातालिकेत मोठी उलथपालथ झाली आहे. पहिला कसोटी सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला.

हा सामना ड्रा झाला होता. तर इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभूत केलंय. त्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत बांगलादेशला, तर ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केलं. यामुळे गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहेत. तर श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून तिसरं स्थान पटकावलंय. तर बांग्लादेश चौथ्या स्थानी असून वेस्ट इंडिज आणि भारताची पिछेहाट झाली.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पहिला कसोटी सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 12 गुण आहेत, विजयी टक्केवारी 100 टक्के आहे. तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आणि एक सामना ड्रॉ झालाय. यामुळे 16 गुणांसह 66.67 विजयी टक्केवारी आहे. बांगलादेशने एक सामना गमावला आणि एक ड्रॉ झाला म्हणून 4 गुणांसह विजयी टक्केवारी 16.67 टक्के झालीय. तर वेस्ट इंडिज आणि भारताने पहिला कसोटी सामना गमावल्याने दोन्ही संघाची विजयी टक्केवारी शून्य झालीय. त्यामुळे या दोन्ही संघांना आता पुढच्या सामन्यात कमबॅक करावं लागणार आहे.

भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर टीम इंडिया गुणतालिकेत तिसरं स्थान गाठू शकतो. भारत आणि इंग्लंडची विजयी टक्केवारी 50 टक्के असेल. दोन्ही संघांची गुणही 12 असतील. दुसरीकडे, वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत केलं. तर त्यांचीही विजयी टक्केवारी 50 असेल आणि पॉईट्स 12 असतील. दरम्यान असं काही घडलं तर श्रीलंकेला फायदा होईल. श्रीलंका 66.67 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानी पोहोचणार आहे. पण यासाठी भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना पुढचे सामने त्यासाठी जिंकावे लागलीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार बारामतीत अॅक्शन मोडवर

UPI Wrong Transfer: UPI वरून चुकीच्या खात्यात पैसे गेले? नियम काय सांगतो? वाचा...

Tea Types: तुम्हीही चहाप्रेमी आहात? मग चहाचे हे 5 प्रकार नक्की ट्राय करा

Government Aircraft : सरकारी हवाई वाहनांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यात येणार? आमदार महेश लांडगे यांचं महापालिका आयुक्तांना पत्र

SCROLL FOR NEXT