team india saam tv
Sports

IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून प्रमुख खेळाडू होऊ शकतो बाहेर

India vs Australia T20I Series: या मालिकेतून प्रमुख खेळाडू बाहेर होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Ankush Dhavre

Hardik Pandya Injury Update:

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या वर्ल्डकप सुरू असताना दुखापतग्रस्त झाला होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला वर्ल्डकप स्पर्धेतूनही माघार घ्यावी लागली होती. आता त्याच्या दुखपतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील २ महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. माध्यमातील वृत्तानूसार या दोन्ही मालिकांमध्ये खेळताना दिसून येणार नाही.

भारतीय संघाला मोठा धक्का...

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे संघाबाहेर होणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण तो आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजीतही मोलाचं योगदान देतो. त्याने अनेकदा तुफान फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. तर गरज असताना विकेट्सही काढून दिल्या आहेत.

हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत लेटेस्ट अपडेट...

हार्दिक पंड्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे की नाही याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. हार्दिक पंड्याने नेट्समध्ये सराव करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने धावत असताना त्याला वेदना जाणवल्या. सध्या तो नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत असून त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. (Latest sports updates)

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की,बांगलादेश संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानाव उतरला होता. त्यावेळी भारतीय संघाकडून ९ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता.या षटकातील पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला. त्यानंतर पुढील २ चेंडूवर बांगलादेशी फलंदाजांनी आक्रमण करत सलग २ चौकार मारले.

या षटकातील तिसरा चेंडू टाकल्यानंतर त्याचा पाय मुरगळला आणि तो जागेवरच पडला. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर फिजियोला मैदानावर यावं लागलं. फिजियो पट्टी त्याच्या पायाला पट्टी बांधली.

त्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला काही गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT