team india squad saam tv news
क्रीडा

IND vs NZ, Team India Squad: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! बुमराहकडे सोपवली मोठी जबाबदारी

Team India Squad For India vs Newzealand Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

Team India Squad For India vs New zealand Test Series: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पुण्यात रंगणार आहे. मालिकेतील तिसरा सामना १ ते ५ दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हे सर्व सामने सकाळी ९:३० वाजता सुरू होतील.

जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहकडे कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. मात्र बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा त्याचा उपकर्णधार म्हणून उल्लेख करण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ज्या खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी देण्यात आली होती. त्याच खेळाडूंचा या मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

SCROLL FOR NEXT