India Asia Cup 2025 Squad Announcement LIVE Updates 
Sports

Asia Cup India Squad : हार्दिकला मोठा झटका, शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी, आशिया कपसाठी सूर्याच्या शिलेदारांची निवड

India Asia Cup 2025 Squad Announcement LIVE Updates : आशिया चषकासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आशियाचा चॅम्पियन होण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Namdeo Kumbhar

BCCI announces Team India's squad for the Asia Cup 2025 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडियाची धुरा असेल तर शुभमन गिल याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही संघात स्थान मिळाले आहे. वर्कलोडमुळे जसप्रीत बुमराहच्या निवडीवर प्रश्नचिन्ह होते, पण त्याला आशिया चषकासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.(Suryakumar Yadav to lead the team, Shubman Gill the Vice Captain) श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले नाही. हार्दिक पांड्या याची उपकर्णधार म्हणूनही निवड झाली नाही, त्याऐवजी गिल याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा हार्दिक पांड्याला धक्का मानला जातोय.

आशिया चषकाच्या संघात जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्यासारख्या प्रमुख खेळाडूंची पुनरागमन झाले आहे. शुभमन गिल याालाही संधी मिळाली आहे. गिलकडे सध्या कसोटी संघाची धुरा आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 754 धावा केल्या होत्या आणि आयपीएल 2025 मधील 650 धावांच्या कामगिरीमुळे त्याला टी-20 मध्ये संधी मिळाली आहे. याशिवाय, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जायसवाल, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल आणि रियान पराग हे स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडले गेले आहेत.

यावेळी आशिया कप टी-20 स्वरूपात (Asia Cup 2025 T20 Format) होणार आहे. आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक गटात चार संघ आहेत, त्यापैकी प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ सुपर फोरमध्ये जातील. त्यानंतर सुपर-4 मधील दोन अव्वल संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडतील. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया चषकाला सुरूवात होणार आहे आणि 28 सप्टेंबर 2025 रोजी अंतिम सामना असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे होणार आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघात कोण कोणते शिलेदार? Full list of Team India squad for Asia Cup 2025

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह

Surya Kumar Yadav (C), Shubman Gill (VC), Abhishek Sharma, Tilak Varma, Hardik Pandya, Shivam Dube, Axar Patel, Jitesh Sharma (WK), Jasprit Bumrah, Arshdeep Singh, Varun Chakaravarthy, Kuldeep Yadav, Sanju Samson (WK), Harshit Rana, Rinku Singh

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2025: सिंह राशीच्या घरात बुध ग्रहाच्या प्रवेशाने ८राशींचे वाढणार टेन्शन; नात्यात दुरावा अन् बसणार आर्थिक फटका

Lonavala Heavy Rain : लोणावळ्यात मुसळधार पाऊस; शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

Maharashtra Rain Live News: कोल्हापुरात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

Monsoon Rain Update: सावधान! महाराष्ट्रासह ६ राज्यात मान्सून घेणार रौद्र रुप; सात राज्यात पावसाचा अलर्ट

Government Land Scam : सामच्या बातमीचा दणका! पुण्यात १८०० कोटींचा शासकीय जमीन घोटाळा उघडकीस, गैरव्यवहार करणाऱ्यांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT