Team India WTC Points Table saam tv
Sports

WTC Point Table : डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठा उलटफेर; बांगलादेश-पाकिस्तान कसोटीमुळं टीम इंडियाला जोरदार झटका

WTC Points Table : बांगलादेश-पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर बघायला मिळाला. पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे.

Nandkumar Joshi

तुलनेनं दुबळ्या असलेल्या बांगलादेश संघानं कसोटी मालिकेत पाकिस्तानला धूळ चारली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करत बांगलादेशनं पाकिस्तानसह टीम इंडियालाही झटका दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी अंतर्गत खेळल्या गेलेल्या या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळं भारतीय संघालाही मोठा फटका बसला. डब्ल्यूटीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे. तर पाकिस्तानचा संघ सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. तर बांगलादेश संघ सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

बांगलादेश संघानं पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात ७८ धावांनी पराभूत केलं. तत्पूर्वी मीरपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०४ धावांच्या फरकाने मात दिली. त्यामुळे डब्ल्यूटीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये बांगलादेश संघाला मोठा फायदा झाला. बांगलादेशच्या संघाने भारतीय संघाला मागे सारत एका स्थानाने झेप घेतली आहे. बांगलादेशचे आता चार कसोटी सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय, एक पराभव आणि एक अनिर्णित सामन्यासह ५८.३३ टक्के गुण आहेत. तर भारताने नऊ कसोटी सामन्यांत चार विजय, चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राखला. भारताचे आता ४८.१५ गुण आहेत.

सुरुवातीच्या दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचणारा भारतीय संघ आता आशियाई देशांच्या रँकिंगमध्ये पाकिस्तानच्या पुढे आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने यावर्षी आतापर्यंत कोणताही कसोटी सामना खेळलेला नाही. भारत आता अफगाणिस्तानविरुद्ध ६ जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, हा डब्ल्यूटीसीचा भाग नाही. भारतीय संघ यावर्षीच्या अखेरीला श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे अनुक्रमे दोन कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर २०२७ मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे.

भारताला मायदेशातील मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने पराभूत व्हावे लागले होते. तर इंग्लंडमध्ये दोन सामने गमवावे लागले होते. गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga : ५०७९ मध्ये खरंच जग संपणार? बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने उडवली खळबळ

अमित ठाकरेंसह २५ जणांवर पुण्यात गुन्हा; प्राचार्यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई, आरोप काय?

Nikki Tamboli Photos: निक्की तांबोळीचा कातील अंदाज; फोटो पाहून नजर हटणार नाही

पुण्यातील कॉलेजबाहेर गांजाविक्री? मनसैनिकांना घेऊन अमित ठाकरेंनी टाकली दुकानावर धाड|VIDEO

Land vs Flat Investment : जमीन की फ्लॅट? तुमचा पैसा कुठे गुंतवला तर होईल जास्त फायदा? खरेदीपूर्वी जाणून घ्या हा फरक

SCROLL FOR NEXT