India vs Pakistan saamtv
Sports

India vs Pakistan : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद

India vs Pakistan News : टीम इंडियाने सुरुवातीला चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद केले आहेत.

Vishal Gangurde

टीम इंडियाला पहिल्या दोन षटकांत दोन गडी बाद करून पाकिस्तानला हादरवलं

पंड्याने पहिल्याच चेंडूवर सॅम अयूबला बाद केलं

बुमराहने मोहम्मद हॅरिसला ६ धावांवर बाद केलं

टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात धमाकेदावर सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन षटकात दोन गडी बाद केले आहेत. हार्दिक पंड्या आणि जसप्रित बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केल्याने चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय.

आशिया कप स्पर्धेचा सहावा सामना भारत-पाकिस्तानदरम्यान दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होत आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने पाकिस्तानला सुरुवातीलाच दोन मोठे दणके दिले.

पाकिस्तानकडून सॅम अयूब आणि साहिजादा फरहान हे दोघे प्रथम फलंदाजीसाठी उतरले. पहिल्या चेंडूत हार्दिक पंड्याने सॅम अयूबला बाद केलं. त्यानंतर बुमहारने त्याची जादू दाखवली. जसप्रित बुमराहने पाकिस्तानचा दुसरा फलंदाज बाद केला.

जसप्रित बुमराहने मोहम्मद हॅरिसला बाद केलं. अवघ्या ६ धावांवर पाकिस्तानला दुसरा झटका बसला. दोन गडी बाद झाल्यानंतर फरहान आणि फखर जमानने संघाची कमान सांभाळली. मात्र, ८ व्या षटकात अक्षरने दोघांची भागीदारी तोडली. फखर हा १७ धावांवर बाद झाला. तिलक शर्माने फखरचा झेल घेतला. तर सलमान फक्त ३ धावांवर बाद झाला. १३ व्या षटकात पाकिस्तानला दोन झटके दिले. हसन नवाज देखील लवकर बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Student Death : इंजिनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, काॅलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं

IND vs PAK : भारताने पाकिस्तानला आशिया कपमध्ये पछाडले, ७ गडी राखत मिळवला सहज विजय

Winter 2025 : गरम कपडे तयार ठेवा! यंदा हाडं गोठवणारी थंडी पडणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics: सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा, शिवसेनेकडून सर्व नेत्यांना महत्वाच्या सूचना

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर मोठी कारवाई, ४० किलोचा गांजा जप्त; तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT