Indian Cricket Team twitter
Sports

Team India, Playing XI: कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? या ११ खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Playing XI For ICC T20 India VS Canada Match: भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा शेवटचा सामना हा कॅनडाविरुद्ध होणार आहे. हा सामना फ्लोरीडामध्ये होणार असून भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. भारतीय संघाने साखळी फेरीत आतापर्यंत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेला धूळ चारली आहे. या ३ विजयांसह भारतीय संघाने सुपर ८ मध्ये दणक्यात एन्ट्री केली आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकून भारतीय संघ नंबर १ राहण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

कशी असेल सलामी जोडी?

या स्पर्धेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने डावाची सुरुवात केली आहे.या सामन्यातही ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. हे दोघे सेट झाले तर ते कुठल्याही गोलंदाजी आक्रमणाला फोडून काढू शकतात.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रिषभ पंत फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज येतोय आणि या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली आहे. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. गेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवनेही अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

या सामन्यात शिवम दुबे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. तर हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. हे दोघेही मधल्या षटकांमध्ये मोठे फटके खेळू शकतात. त्यामुळे या दोघांचीही भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.

या सामन्यासाठी सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. तर आठव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव खेळताना दिसून येऊ शकतो. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग या तिघांनी चांगली गोलंदाजी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT