team india  twitter
Sports

Team India Playing XI: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताची प्लेइंग ११ ठरली? या खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Playing XI News In Marathi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान या स्पर्धेसाठी कशी असू शकते भारताची संभावित प्लेइंग ११? जाणून घ्या

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघ आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडणं मुळीच सोपं नसणार आहे. दरम्यान कोणत्या खेळाडूंना या संघात संधी मिळू शकते? जाणून घ्या.

सलामीला कोणाला मिळणार संधी?

या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करताना दिसून येईल. त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल सलामीला येईल. यासह यशस्वी जयस्वालला बॅकअप म्हणून संधी दिली जाऊ शकते.

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येईल. या क्रमांकावर खेळताना विराटने धावांचा पाऊस पाडला आहे. तर श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. श्रेयस अय्यरला संघात संधी मिळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

या स्पर्धेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे रिषभ पंतला संघाबाहेर बसावं लागेल. यासह अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

या गोलंदाजांना मिळू शकते संधी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. यासह वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांना संधी मिळू शकते.

या स्पर्धेसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत ठाकरेसेनेला खिंडार, जेष्ठ नेत्यानं असंख्य सहकाऱ्यांसह हाती घेतलं 'कमळ'

Bangladesh: आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; धुराच्या काळोखात Airport गुडूप,धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT