indian cricket team  saam tv
Sports

IND vs NEP, Playing 11: दमदार कामगिरी करूनही 'हा' विस्फोटक फलंदाज बाकावरच; रोहितने आपल्याच भिडूला ठेवलं संघाबाहेर

Suryakumar Yadav: दमदार कामगिरी करूनही या फलंदाजाला संघबाहेर राहावं लागलं आहे.

Ankush Dhavre

India vs Nepal, Asia Cup 2023:

आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना श्रीलंकेच्या पल्लेकेलमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर नेपाळच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या सामन्यापूर्वीच हे स्पष्ट होतं की, प्लेइंग ११ मध्ये बदल होणार आहे. बदल झाला,मात्र संघातील आक्रमक फलंदाजाला या सामन्यातही बाकावर बसून राहवं लागलं आहे.

या खेळाडूला ठेवलं बाहेर...

पाकिस्तान विरूद्ध झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले होते. मात्र या सामन्यात श्रेयस अय्यरला मोठी खेळी करता आली नव्हती. तो लवकर बाद होऊन माघारी परतला होता.

त्यामुळे असं वाटलं होतं की,नेपाळविरूद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. मात्र असं काहीच झालं नाही. त्याला या सामन्यातही बाहेर बसावं लागलं आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्याचा जलवा..

सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमधील नंबर १ फलंदाज आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. मात्र ही कामगिरी तो वनडे क्रिकेटमध्ये करू शकलेला नाही.

फेब्रुवारी २०२२ पासून ते आतापर्यंत त्याला वनडेत एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. तर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करत असेल तर सु्र्यकूमार यादवला संधी मिळणं कठीण आहे. (Latest sports updates)

नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Balance: पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले? मिस्ड कॉल, SMS वरुन चुटकीसरशी करा चेक

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT