IND VS WI: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना आजपासून त्रिनिदादमध्ये रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १४१ धावांनी विजय मिळवला होता.
यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये बदल करणार असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान एक खेळाडू असा आहे ज्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात ड्रॉप केलं जाऊ शकतं.
वेस्टइंडीजविरुद्ध होणाऱ्या त्रिनिदाद कसोटीत भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या खेळाडूला दुसऱ्या कसोटीत ड्रॉप केलं जाऊ शकतं.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आहे. गेल्या काही वर्षांपासून संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या जयदेव उनाडकटला संघात संधी मिळाली मात्र तो संधीचा फायदा घेऊ शकला नाही. त्यामुळे त्याला बाहेर ठेऊन रोहित शर्मा अतिरिक्त फिरकी गोलंदाजाला संधी देऊ शकतो. भारतीय संघात आर अश्विन आणि रविंद्र जडेजा हे २ फिरकी गोलंदाज आहेत.
तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. कारण ओव्हलची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे भारतीय संघ २ वेगवान गोलंदाज आणि ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो.
जयदेव उनाडकटला बाहेर ठेवल्यास मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरवर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.(Latest sports updates)
रोहित शर्माने मोठ्या विश्वासाने जयदेव उनाडकटला संघात स्थान दिलं होतं. मात्र तो या संधीचं सोनं करू शकला नाही. दोन्ही डावात मिळून त्याला एकही गडी बाद करता आला नाही. त्याची ही फ्लॉप कामगिरी पाहता त्याला संघाबाहेर केलं जाऊ शकतं. २०१० पासून ते २०२३ पर्यंत जयदेव उनाडकटला केवळ ३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान तिन्ही सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या ३ सामन्यांमध्ये त्याला केवळ ३ गडी बाद करता आले आहेत.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११ :
यशस्वी जयस्वाल,रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, अंजिक्य रहाणे, ईशान किशन, रविंद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट/ अक्षर पटेल
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.