TEAM INDIA YANDEX
Sports

IND vs BAN, Playing XI: टीम इंडियाची प्लेइंग 11 जवळपास पक्की... रोहित या 5 खेळाडूंना बसवणार

Team India Playing XI, IND vs BAN: चेन्नईच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Team India Playing XI Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यासाठी १६ खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

या १६ पैकी ११ खेळाडूंची निवड करणं हे रोहित शर्मा समोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यासाठी कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११?जाणून घ्या.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणर आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना चांगली मदत मिळते.

त्यामुळे भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. ज्यात आर अश्विन, रविंद्र जडेजा यांना स्थान मिळणं जवळजवळ निश्चित आहे. तर तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव किंवा अक्षर पटेलपैकी एकाला संधी मिळू शकते.

या वेगवान गोलंदाजांना मिळू शकते संधी

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो वेगवान गोलंदाजी आक्रणम लीड करताना दिसेल. त्याला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराचजा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.

अशी असू शकते बॅटींग लाईनअप

या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. त्यानंतर विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल आणि रिषभ पंत यांचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. रिषभ पंत तब्बल २० महिन्यांनंतर भारतीय संघात कमबॅक करताना दिसून येणार आहे.

या खेळाडूंना संधी मिळणं कठीण

रिषभ पंतचं कमबॅक झालं, तर ध्रुव जुरेलला बाकावर बसावं लागेल. तर केएल राहुलला संधी मिळाल्यास शुभमन गिलला संधी मिळणं कठीण आहे. यासह पहिल्यांदाच संधी मिळालेल्या यश दयालला देखील आपल्या संधीची वाट पाहावी लागणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सरफराज खान, केएल राहुल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी भाजपकडून हालचालींना वेग, ३० जणांची नावं दिल्ली दरबारी; या नेत्यांच्या नावाचा समावेश?

SCROLL FOR NEXT