Team India ODI World Cup: SAAM TV
Sports

Team India ODI World Cup: ...तर वनडे वर्ल्डकप आपलाच!, हे 'धाकड' खेळाडू ठरतील गेमचेंजर

टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी मिळाली तर ते नक्कीच वर्ल्डकप विजेतेपद जिंकून देऊ शकतील.

Nandkumar Joshi

Team India Mission ODI World Cup : टीम इंडिया आता बांगलादेश दौऱ्याची तयारी करत आहे. ४ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. ही मालिका पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप २०२३ ची रंगीत तालीम असल्याचं मानलं जात आहे. कारण या मालिकेत टीम इंडियाचे सर्व वरिष्ठ आणि अनुभवी खेळाडू खेळत आहेत. बऱ्याच काळानंतर कोणत्या वनडे मालिकेत रोहित शर्मा-विराट कोहली-केएल राहुल यांसारखे खेळाडू एकत्रित खेळणार आहेत.

वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये टीम इंडियातील काही खेळाडू सर्वात मोठे गेमचेंजर ठरू शकतात. मग ते आता संघात असो किंवा नसो. ते आता संघात पुनरागमनच्या प्रतीक्षेत आहेत. या खेळाडूंचं संघात असणं टीम इंडियासाठी महत्वाचे ठरणार आहे.

उमरान मलिक - जम्मू एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकनं आपल्या वेगवान चेंडूनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. सातत्यानं १४५ प्रतितास वेगानं तो गोलंदाजी करतोय. मलिकनं टी २० आणि वनडेमध्ये भारतासाठी पदार्पण केलं आहे. मात्र, त्याला हवी तितकी संधी मिळत नाही. टीम इंडियाला वनडे वर्ल्डकपमध्ये धमाका करायचा असेल तर, उमरानला संधी द्यावी लागेल. वर्ल्डकप स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. अशात वेगवान चेंडूनं तो प्रतिस्पर्धी संघाला गारद करणार हे नक्की.

सूर्यकुमार यादव - टी २० फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार यादवनं आपल्या फलंदाजीनं सगळ्यांनाच हैराण केलं आहे. त्यानं चांगल्या चांगल्या फलंदाजांना मागे टाकलंय. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. पण तो टीम इंडियासाठी गेमचेंजर ठरू शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन तो धावा खोऱ्यानं ओढू शकतो. सुरेश रैना जी कामगिरी करायचा तीच कामगिरी सूर्यकुमार करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पृथ्वी शॉ - टीम इंडियाच्या युवा सलामीवीराला बऱ्याच काळापासून दुर्लक्षित केलं आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खोऱ्यानं धावा ओढणाऱ्या आणि जबरदस्त स्ट्राइक रेट असणाऱ्या पृथ्वी शॉ याला टीम इंडियात स्थान दिलेलं नाही. वनडे मालिका आणि टी २० स्पर्धेतही पृथ्वीला संधी दिलेली नाही. लिस्ट ए क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने ५० हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. पृथ्वी हा उत्तम पर्याय आहे. वेगानं धावा करणे आणि मोठी इनिंग खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. (Latest Marathi News)

श्रेयस अय्यर - टीम इंडियाकडे रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, शिखऱ धवन यांसारखे दिग्गज टॉप ऑर्डरमध्ये आहेत. मात्र, मधली फळी कमकुवत मानली जाते. अशात श्रेयस अय्यर मधल्या फळीत दमदार कामगिरी करू शकतो. ज्या-ज्या वेळी त्याला वनडे क्रिकेटमध्ये संधी मिळाली आहे, त्यात तो धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. श्रेयस ३६ वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याने १४२८ धावा केल्या आहेत. जवळपास ५० च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. या छोट्याशा कारकीर्दीत त्यानं दोन शतके, १३ अर्धशतके केली आहेत. (Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

SCROLL FOR NEXT