team india  saam tv
क्रीडा

Team India New Sponsor: BYJU'S ची कायमची सुट्टी! टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार Dream 11 चा लोगो; तब्बल इतक्या कोटींचा केला करार

Ankush Dhavre

Team India: भारतीय संघाच्या जर्सीवर तुम्ही BYJU'S चा लोगो पाहिला असेल. मात्र यापुढे भारतीय संघाच्या जर्सीवर Dream 11 चा लोगो दिसून येणार आहे. BCCI ने परिपत्रक प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली आहे. यापुढे Dream 11 हे भारतीय संघाचे मुख्य स्पॉन्सर असणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) मोठी घोषणा केली आहे. आता फँटसी स्पोर्ट्स गेमिंग कंपनी Dream 11 भारतीय संघाची मुख्य स्पॉन्सर असणार आहे. भारतीय संघ येत्या १२ जुलैपासून वेस्ट इंडिज संघाविरुद्ध २ हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

या मालिकेत भारतीय संघ Dream 11 चा लोगो असलेली जर्सी घालून मैदानावर उतरणार आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि Dream 11 यांच्यात ३५८ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.

भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळताच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी म्हटले की, 'मी Dream 11 चे अभिनंदन करतो आणि बोर्डात त्यांचे स्वागत करतो. बीसीसीआय आणि Dream 11 चं नातं आणखी मजबूत होत चाललं आहे. मला असा विश्वास आहे की, या भागीदारीने आम्ही जास्तीत जास्त फॅन्सपर्यंत पोहचू.' (Latest sports updates)

आदिदाससोबत केला होता करार

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने नव्या जर्सी स्पॉन्सरची घोषणा केली होती. बीसीसीआयने आदिदाससोबत ५ वर्षांचा करार केला आहे. २०२८ पर्यंत भारतीय संघाच्या जर्सीवर आदिदासचा लोगो झळकणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT