कोहलीचं कसं होणार! कुंबळे पुन्हा होणार Team India चे हेडमास्तर? Twitter
Sports

कोहलीचं कसं होणार! कुंबळे पुन्हा होणार Team India चे हेडमास्तर?

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अडचणीत वाढ झाली आहे.

वृत्तसंस्था

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) अडचणीत वाढ झाली आहे. रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर (T-20 World Cup) संपणार आहे. आता बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) खांद्यावर टाकण्याच्या तयारीत आहे. माजी कर्णधार आणि लेगस्पिनर कुंबळेचे 2017 मध्ये कोहलीशी गंभीर मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या विश्वचषक टी -20 साठी मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. त्याचवेळी, गुरुवारी, कोहलीने जाहीर केले की, टी -20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या टी-20 स्वरुपातले कर्णधार पद सोडणार आहे. मात्र, त्याने केवळ टी -20 सामन्यांच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. तो एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार राहील.

चार वर्षांपूर्वी कुंबळे प्रशिक्षकपदावरून पायउतार झाल्यानंतर लगेचच कोहलीने बीसीसीआय आणि तत्कालीन माजी कॅग विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समितीला शास्त्रींना नवीन प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केलेल्या पॅनेलच्या शिफारशींनंतर कुंबळेला परत आणण्यासाठी चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयला वाटते की संघाला नवीन प्रशिक्षकाची गरज आहे. कोहलीच्या निर्णयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गुरुवारी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बोर्डाकडे टीम इंडियासाठी स्पष्ट रोडमॅप आहे. असे मानले जाते की बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने कुंबळेला कोहलीशी मतभेद असूनही 2017 मध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून कायम राहावे अशी इच्छा होती. त्यावेळी गांगुली बीसीसीआयच्या क्रिकेट सुधार समितीचे सदस्य होते.

कुंबळे यांची जून 2016 मध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. भारताने 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली. त्यात अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. कुंबळे सध्या आयपीएलची फ्रँचायझी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. कुंबळेशी संपर्क साधण्यापूर्वी बीसीसीआयने श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्याशीही संपर्क साधल्याचे मानले जाते.

जर कुंबळे बोर्डवर येण्यास सहमत असेल तर त्याला आयपीएलमधील काम सोडावे लागणार आहे. कुंबळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीचा प्रमुख देखील आहे. 2016 मध्ये जेव्हा कुंबळेची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर काही दिवसांनी कोहली आणि कुंबळे यांच्यात वाद दिसू लागले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT