Indian Cricket Team: भारतीय संघाला यावर्षी काही महत्वाच्या स्पर्धा खेळायच्या आहेत. ज्यात आशिया चषक आणि वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान भारतात केले जाणार आहे.
गेल्या १ दशकापासून भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही. आता मायदेशात ही स्पर्धा होत असल्याने रोहित शर्मावर ट्रॉफी जिंकुन देण्यासाठी दबाव असणार आहे. मात्र ही ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतीय संघाला काही गोष्टींमध्ये बदल करावा लागणार आहे.
टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना करावी लागेल दमदार सुरुवात..
भारतीय संघाला जर वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची असेल तर नक्कीच टॉप ऑर्डरला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. केवळ खेळपट्टीवर टिकून चालणार नाही तर, धावांचा पाऊस देखील पाडवा लागणार आहे. जर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली, तर शेवटी येणारे फलंदाज आक्रमक फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारू शकतात.
योग्य प्लेइंग ११ ची निवड..
मुख्य बाब म्हणजे योग्य प्लेइंग ११ ची निवड. कारण एक चूक चुकीचा निर्णय भारतीय संघाला महागात पडू शकतो. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही ही चूक घडल्याने भारतीय संघाला गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. अंतिम सामन्यात आर अश्विनला संघाबाहेर ठेवलं गेलं होतं. (Latest sports updates in marathi)
अनुभवी गोलंदाज असणं गरजेचं..
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह फिट झाला असून तो लवकरच कमबॅक करू शकतो. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने चांगली कामगिरी केली. मात्र कुठेतरी अनुभवाची कमतरता जाणवली. जर जसप्रीत बुमराहचे या संघात कमबॅक झाले. तर नक्कीच भारतीय गोलंदाजी आक्रमण आणखी मजबूत होऊ शकते.
अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी..
भारतीय संघातील खेळाडूंना देखील परिस्थितीनुसार खेळ करावा लागणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर, ज्या संघातील अष्टपैलू खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे त्याच संघाने ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघासाठी युवराज सिंगने ही कामगिरी करून दाखवली आहे. जर इंग्लंड संघासाठी बेन स्टोक्सने ही कामगिरी केली होती. आता हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजावर चांगली कामगिरी करून ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी असणार आहे.
योग्य खेळाडूची निवड करणं गरजेचं..
भारतीय संघात एकापेक्षा एक खेळाडू आहेत. मात्र फक्त आकडेवारी पाहून खेळाडूला संघात स्थान देणं चुकीचं ठरेल. जो खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि परिस्थिती समजून आपल्या खेळात बदल करेल, अशाच खेळाडूला संधी दिली गेली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.