Abhishek Sharma 16 sixes century saam tv
Sports

Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या 16 षटकारांचं वादळ; 32 चेंडूत शतक ठोकून रचला इतिहास

Abhishek Sharma 16 sixes century: भारतीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अभिषेक शर्मा याने तब्बल १६ षटकारांचा पाऊस पाडत केवळ ३२ चेंडूत शतक झळकावलंय.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळवण्यात येतेय. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये पंजाब टीमचा आज तिसरा सामना होता. पंजाब विरूद्ध बंगाल अशा या सामन्यात पंजाबचा फलंदाज अभिषेक शर्माने उत्तम खेळ केला. अभिषेकने 11 सिक्स आणि 7 चौकारांच्या मदतीने फक्त 32 बॉल्समध्ये शतक पूर्ण केलं. त्याने एकूण 52 बॉल्समध्ये 148 रन्स केले. ज्यामध्ये 16 सिक्स आणि 8 चौकारांचा समावेश होता.

टी-20 मधील 8 वं शतक

अभिषेक शर्माचं टी20 क्रिकेटमधील हे 8 वं शतक ठरलंय. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या भारतीयांमध्ये अभिषेक आता टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या बरोबरीत पोहोचलाय. भारतीय फलंदाजांमध्ये रोहित आणि अभिषेकपेक्षा जास्त टी20 शतकं फक्त दिग्गज विराट कोहली (9) यांच्या नावावर आहेत.

12 चेंडूंमध्ये ठोकलं अर्धशतक

या सामन्यात अभिषेकने फक्त 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. हे पुरुषांच्या टी20 क्रिकेटमधील संयुक्तरित्या तिसरं सर्वात जलद अर्धशतक ठरलं. त्याचप्रमाणे भारतीय खेळाडूंमध्ये संयुक्तरित्या दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. अभिषेकने युवराज सिंहची बरोबरी केली. युवराजन 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध 12 बॉल्समध्ये ५० रन्स केले होते.

पुरुषांच्या टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक नेपाळच्या दीपेन्द्र सिंह एरीने केलेत. त्याने सप्टेंबर 2023 मध्ये हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध फक्त 9 चेंडूंमध्ये फिफ्टी केले होते. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा आशुतोष शर्मा आहे. ज्याने रेल्वे टीमकडून अरुणाचल प्रदेशविरुद्ध 11 चेंडूंमध्ये अर्धशतक केलं होतं. ही खेळी 2023-24 सिझनमधील सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये झाली होती.

दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय स्कोअर

अभिषेक शर्मा आता टी20 क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वैयक्तिक स्कोअर करणारे भारतीय फलंदाज ठरलेत. यावेळी श्रेयस अय्यर यांना मागे टाकलंय. ज्याने फेब्रुवारी 2019 मध्ये मुंबईकडून सिक्कीमविरुद्ध 147 रन्स केले होते. या यादीत पहिल्या क्रमांकावर तिलक वर्मा असून ज्याने नोव्हेंबर 2024 मध्ये हैदराबादकडून मेघालयविरुद्ध 151 रन्स केलेत.

पंजाबचा विक्रमी स्कोअर

अभिषेक शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर पंजाब टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 310 रन्स केले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये ही फक्त पाचवी वेळ आहे, जेव्हा एखाद्या टीमने एका सामन्यात 300 पेक्षा जास्त रन्स केलेत. टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा संघीय स्कोअर वडोदरा टीमने केला आहे. डिसेंबर 2024 मध्ये वडोदऱ्याने सिक्कीमविरुद्ध 5 विकेट्स गमावून 349 रन्स केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय; सचिन तेंडुलकरला बाद ठरवून चूक केली, अंपायर स्टीव्ह बकनरला २२ वर्षांनी पश्चाताप

Accident CCTV Video: बाईक घसरली अन् डोकं थेट डंपरच्या चाकाखाली, कल्याण–मुरबाड रोडवर भयंकर अपघात

Detox Face Mask : चेहऱ्यावर आरशासारखी चमक हवीय? 'या' ४ गोष्टी वापरा अन् चेहरा डिटॉक्स करा

Maharashtra Live News Update: पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

Supriya Sule : सुप्रिया सुळेंना मोदी सरकारकडून मोठी जबाबदारी, खासदाराच्या त्या गटाचे करणार नेतृत्व

SCROLL FOR NEXT