ICC ODI Team Rankings saam tv
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला नंबर १ बनण्याची संधी! रोहित सेनेला करावं लागेल हे काम

ICC ODI Team Rankings: वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाकडे नंबर १ बनण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

Team India ODI Rankings:

भारतीय संघाने आशिया चषकातील सुपर ४ च्या सामन्यात सलग २ दिवशी २ सामने जिंकले आहेत. भारत- पाकिस्तान सामना हा १० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना राखीव दिवशी म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला होता.

या सामन्यात भारतीय संघाने २२८ धावांनी तर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने ४१ धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीचा फायदा भारतीय संघाला आयसीसीच्या रँकिंगमध्ये झाला आहे.

भारतीय संघाला नंबर १ बनण्याची संधी..

भारतीय संघाने गेल्या ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारतीय संघाच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे. आगामी वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला नंबर १ बनण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

यासाठी श्रीलंका विरूद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवणं गरजेचं आहे. तर भारतीय संघाला बांगलादेश विरूद्ध होणाऱ्या सामन्यात आणि अंतिम फेरीत श्रीलंकेला हरवणं गरजेचं आहे.

भारतीय संघ नंबर १ होणार की नाही, ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या मालिकेवर अवलंबून असणार आहे.

या मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांमध्ये जर ऑस्ट्रेलियाचा संघ पराभूत झाला,तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानला मागे सोडत भारताचा संघ वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी येऊ शकतो. (Latest sports updates)

पाकिस्तानला नंबर १ स्थानी टिकून राहायला करावं लागेल हे काम..

श्रीलंकेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात जर पाकिस्तानचा संघ पराभूत झाला तर पाकिस्तानच्या रेटिंगमध्ये ३ पाँईट्सची घसरण होऊ शकते. असं झाल्यास पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानी येऊ शकतो.

सध्या पाकिस्तानचा संघ ११८ रेटिंग पाँईट्ससह अव्वल स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ ११८ रेटिंग पाँईट्ससह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानला जर रँकिंगमध्ये अव्वल स्थानी टिकून राहायचं असेल तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT