Team India announced For Test and One day Series : भारतात सध्या आयपीएलची धूम सुरू आहे. लीग स्टेजचे काही सामनेच शिल्लक आहेत. आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ जूनमध्ये कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार का, याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
भारतीय संघ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना आणि ३ वनडे सामने होणार आहेत. आयपीएलची धूम सुरू असतानाच, १९ मे रोजी गुवाहाटीत निवड समितीची बैठक झाली. त्यात कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्यात आला. एक कसोटी सामना होणार असून, तो ६ जून रोजी मुल्लांपूरला सुरू होईल. त्यासाठी १४ सदस्य असलेल्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे २०१८ नंतर म्हणजेच आठ वर्षांनी भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना असेल. २०१८ मध्येच अफगाणिस्तानने बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पहिल्यांदाच अधिकृतरित्या कसोटी सामन्यात भाग घेतला होता. भारताने तो सामना एक डाव आणि २६२ धावांनी जिंकला होता.
अफगाणिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी १५ सदस्यांचा भारतीय संघ घोषित केला आहे. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही दिग्गजांना स्थान देण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे भारताच्या वनडे संघातून ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर कसोटी संघाचं उपकर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. याआधी कसोटी संघाचं उपकर्णधारपद पंतकडे होते. पंतला कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा वगळण्यात आले आहे. निवड समितीने शमीच्या नावाची साधी चर्चा सुद्धा केली नाही, असे अजित आगरकरने स्पष्ट केले.
भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी त्याचा वर्कलोड मॅनेज करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. तर कसोटी आणि वनडे मालिकेसाठी दोन नव्या चेहऱ्यांना संघात संधी दिली आहे. तर दोन्ही संघांमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यात मानव सुतार, हर्ष दुबे, गुरनूर बराड, प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. मानवला कसोटी संघात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. तर गुरनूर बराड आणि हर्ष दुबे या दोघांना दोन्ही संघात घेतले आहे. प्रिन्स यादवला वनडे संघात पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
६ जून रोजी पहिला कसोटी सामना न्यू चंदीगड येथे सकाळी साडेनऊ वाजता होईल.
पहिला वनडे सामना १४ जून रोजी धर्मशाला येथे दुपारी दीड वाजता सुरू होईल.
१७ जून रोजी दुसरा वनडे सामना होईल. लखनऊच्या मैदानावर दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
२० जून रोजी तिसरा सामना चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना देखील दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, गुरनूर बराड, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.