Rishabh Pant teasing Kuldeep Yadav  saam tv
Sports

Rishabh Pant: घे आईची शप्पथ की...; सामन्यादरम्यान ऋषभ पंतने कुलदीप यादवला असं का सांगितलं? Video होतोय व्हायरल

Rishabh Pant teasing Kuldeep Yadav VIRAL VIDEO: दुलिप ट्रॉफीमध्ये इंडिया ए विरूद्ध इंडिया बी यांच्यात सामन्यात खेळवला गेला. या सामन्यात पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या देशांतर्गत दुलिप ट्रॉफी खेळवण्यात येत असून या स्पर्धेमध्ये टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी भाग घेतला आहे. ऋषभ पंत देखील इंडिया बी टीममधून खेळत होता. सामना सुरु असताना ज्यावेळी पंत विकेटकीपींग करतो तेव्हा काही ना काही मजेशीर किस्सा घडतोच. असाच एक किस्सा दुलिप ट्रॉफीच्या सामन्यात देखील पहायला मिळाला.

इंडिया बीच्या टीमची फिल्डींग सुरु असताना ऋषभ पंत विकेटकिपींग करत होता. यावेळी पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पंत कुलदीप यादवला चिडवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.

पंतने कुलदीप यादवला भर मैदानात डिवचलं

दुलिप ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये इंडिया ए आणि इंडिया बी यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात इंडिया बीचा 76 रन्सने विजय झाला. या सामन्यात शेवटच्या दिवशी ४४ व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादव आणि आकाश दीप क्रिझवर होते. त्यावेळी स्टंप्सच्या मागून ऋषभ पंत कुलदीपला त्रास देत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. पंत कुलदीपला सतत एक-एक रन घेण्यासाठी सांगतो होता, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंत कुलदीपला काय सांगतो?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋषभ पंत कुलदीप यादवला सांगतो की, "तुझी मर्जी आहे, तू सिक्स मार किंवा सिंगल रन घे. भावा त्याला २ सिंगल घेऊद्या, त्याच्यासाठी खूप मोठा प्लॅन तयाक केला आहे." पंतच्या या गोष्टी ऐकून कुलदीपलाही हसू आवरत नाही आणि कुलदीप म्हणतो, ठीक आहे भाई, इतका का त्रास देतोयस?

कुलदीपच्या प्रश्नावर मजेशीररित्या उत्तर देताना पंत म्हणतो की, मग आऊट हो ना लवकर. पुढच्या ३ ओव्हरमध्ये तु आऊट होशील. गंमतीशीर बाब म्हणजे जसं पंत म्हणतो, तसंच घडतं. ३ ओव्हरमध्ये कुलदीपची विकेट गमावल्यानंतर पंत आनंदाने, आऊट झाला...आऊट झाला असं म्हणून उड्या मारू लागतो.

पंतचा अजून एक व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये पंत कुलदीपला, आईची शपथ घ्यायला सांगतोय. झालं असं की, ऋषभ पंत कुलदीपकडे बोट दाखवत म्हणतो की सर्वांनी पुढे या, तो सिंगल घेणार आहे. तेव्हा कुलदीप म्हणतो की, मी सिंगल घेणार नाही. मग पंत गमतीने त्याला सांगतो की, खा आईची शप्पथ की तू सिंगल रन घेणार नाही.

दरम्यान हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते यावर विविध कमेंट्स करतायत. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देखील पंत अशाप्रकारे विकेटकीपिंग करताना मजामस्करी करत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

Ashadh Wari: वारकरी परंपरेत अनन्यसाधारण स्थान असलेल्या बाजीराव विहिरीत भाविकांची अलोट गर्दी|VIDEO

Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

SCROLL FOR NEXT