T20 World Cup, Team India Playing 11/ File Photo saam tv
क्रीडा

T20 World Cup: नेदरलँडविरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होणार का? प्रशिक्षक काय म्हणाले? वाचा

टी २० वर्ल्डकपमध्ये नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का? वाचा सविस्तर माहिती

Nandkumar Joshi

T20 WC 2022, India vs Netherlands : भारतीय संघाने टी २० वर्ल्डकपची सुरुवात झोकात केली आहे. पहिल्याच हायव्होल्टेज लढतीत भारताने पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला आहे. पाकिस्तानविरुद्ध चार विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला.

पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना हा नेदरलँडसोबत होणार आहे. हा सामना सिडनी येथे होणार आहे. (Team India)

भारत विरुद्ध नेदरलँड यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी मोठी अपडेट दिली आहे. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार का या प्रश्नावर महत्वाची माहिती दिली.

आगामी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कुणालाही विश्रांती देण्याच्या बाबतीत विचार केलेला नाही. पुढच्या सामन्यात हार्दिक पंड्याही खेळणार आहे, असे म्हाम्ब्रे म्हणाले. (Cricket News)

मागील सामन्यात कोहलीने विजयी खेळी केली. कोणत्याही अनुभवी फलंदाजाने शेवटपर्यंत मैदानात राहून सामना जिंकून दिल्याने प्रतिस्पर्धी संघावरील दडपण आणखी वाढू शकतो. त्यामुळे विराट आणि हार्दिक पंड्या या दोघांनाही या विजयाचा श्रेय घेण्याचा हक्क आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याचं कौतुक केलं. सामन्यात गरजेवेळी त्याने केलेली गोलंदाजी कौतुकास्पद आहे. कारकिर्दीत चढ-उतार येतातच, मात्र त्याने ज्या प्रकारे पुनरागमन केलंय, ते गौरवास्पद आहे, असेही म्हाम्ब्रे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT