Super 8 matches in T20 World Cup Team India saam tv
Sports

T20 World Cup : सुपर ८ सामन्यांवेळी पाऊस पडला, तर गोंधळात पडू नका! ICC चे नियम जाणून घ्या

T20 World Cup Super 8 Matches : टी २० वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतील पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. सुपर ८ मधील एखादा सामना पावसामुळं रद्द झाला तर काय? आयसीसीचे नियम जाणून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल.

Nandkumar Joshi

Ind vs SA : टी २० वर्ल्डकप २०२६ मधील सुपर ८ फेरी सुरू होणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्टइंडीज, श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ या फेरीत पोहोचले आहेत. हे आठ संघ दोन गटांत विभागले आहेत. सर्व संघ आमनेसामने येणार असून, प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सेमिफायनलमध्ये पोहोचतील. त्यामुळे प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे. पण या दरम्यान एखादा सामना पावसामुळं रद्द करावा लागला तर काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पावसामुळं सामना रद्द झाला तर काय?

गट फेरीतील सामन्यांप्रमाणेच सुपर ८ फेरीतील सामने देखील भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांत खेळवले जाणार आहेत. कोलंबोत पावसाचे संकट कायम आहे. त्यामुळे एखादा सामना रद्द झाला तर काय होणार, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. विशेष म्हणजे, सुपर ८ मधील कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस नाही. आयसीसीच्या नियमानुसार, टी २० सामन्याच्या निकालासाठी दोन्ही संघांनी किमान प्रत्येकी पाच षटके खेळलेली असावीत. त्यामुळे निकाल लागण्यासाठी सामना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न पंचांचा असणार आहे.

पावसामुळे सामना प्रत्येकी पाच षटकांचा होऊ न शकला तर, सामना रद्द करण्यात येईल. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. या सामन्यात कोणीही विजेता संघ नसेल. नेट रन रेटवर काहीही परिणाम होणार नाही. पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघांचे गुण वाढतील. कोणत्याही एका संघाला फायदा मिळणार नाही.

एका संघाला खेळावे लागणार ३ सामने

सुपर ८ फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळावे लागणार आहेत. प्रत्येक सामना या आठ संघांसाठी महत्वाचा असेल. सुपर ८ मध्ये प्रत्येक लढत दोन गुणांसाठी होणार आहे. पावसामुळं सामना रद्द झाला तर, विजयाची संधी हुकणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत एखाद्या संघाला यामुळं मोठा फटका बसू शकतो. या स्पर्धेत झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळं रद्द झाला होता. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

Maharashtra Live News Update : वाशिममध्ये शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला

बारामती पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान|VIDEO

By-Election: मविआ की सुनेत्रा पवार? बारामती पोटनिवडणूकाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील: संजय राऊत

Bollywood Celebrities: नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडचा ग्लॅमर

SCROLL FOR NEXT