T20 World Cup, Pak vs NZ Semifinal 1 : टी २० वर्ल्डकपमध्ये आज बुधवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमिफायनला सामना सुरू होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या केन विलियम्सननं ४६ धावांची महत्वाची खेळी केली. न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली होती. फिन एलेन याने ४ आणि ड्वेन कॉनवे २१ धाव करून बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर विलियमसननं डाव सावरला. त्याने डॅरेल मिचेलच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचली. ही भागीदारी पाकिस्तानचा अष्टपैलू नवाजच्या एका चुकीने झाली, असंच म्हणता येईल.
विलियम्सनला बाद करण्याची नामी संधी मोहम्मद नवाझला होती. पण त्याने ती दवडली. आठव्या षटकात ही संधी हुकली. ग्लेन फिलिप्स याने नवाझच्या चेंडूवर त्याच्याकडेच फटका टोलवला. चेंडू हा नवाझच्या हातात होता. विलियम्सन हा नॉन स्ट्राइक एंडवर क्रिझच्या बाहेर होता. नवाझच्या हातात चेंडू बघून विलियम्सन पटकन मागे वळला आणि क्रीझमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण तो क्रीझमध्ये पोहोचू शकला नाही. तरीही नवाझनं त्याला धावबाद केलं नाही. (Cricket News)
विलियम्सनला जीवदान, फिलिप्सच ठरला बळी
मोहम्मद नवाझकडे (Pakistan Cricket Team) आयती आलेली संधी हुकली. विलियम्सनला तो बाद करू शकला नाही. मात्र, त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर विस्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सला बाद केलं. नवाझच्या हाती त्याने झेल दिला. फिलिप्सने ८ चेंडूंत फक्त सहा धावा केल्या. विलियम्सनला मिळालेल्या संधीचा फायदा त्याने घेतला. मिचेलसोबत त्याने चौथ्या विकेटसाठी ५० चेंडूत ६८ धावांची भागीदारी रचली.
पाकिस्तान फायनलमध्ये...
दरम्यान, टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिला संघ निश्चित झाला आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमिफायनलचा सामना झाला. यात पाकिस्ताननं ७ विकेटने न्यूझीलंडला पराभूत केलं आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.