T20 World Cup Pak Vs Afg Shaheen Shah Afridi perfect yorker /Social Media Saam TV
क्रीडा

T20 World Cup : शाहीन आफ्रिदीनं खतरनाक यॉर्कर टाकला, फलंदाजाला पाठीवरून मैदानाबाहेर न्यावं लागलं

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी ठरणार धोकादायक.

Nandkumar Joshi

T20 World Cup, Pak Vs Afg : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पूर्णपणे फिट झाला आहे. सराव सामन्यात शाहीनची गोलंदाजी बघून तो स्पर्धेतील सर्वात धोकादायक गोलंदाज असेल यात शंकाच नाही. अफगाणिस्तान संघाविरुद्ध आफ्रिदीनं खतरनाक गोलंदाजी केली. चार षटकांत केवळ २९ धावा देत दोन विकेट घेतल्या.

या तेजतर्रार गोलंदाजानं आपल्या गोलंदाजीनं प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना धडकी भरवली आहे हे नक्की. अफगाणिस्तानचा विकेटकीपर आणि फलंदाज रहमनुल्लाह गुरबाज याला यॉर्कर टाकून जखमी केलं आहे. हा यॉर्कर चेंडू गुरबाजच्या पायावर लागला. शेवटी त्याला संघ सहकाऱ्याने पाठीवर मैदानाबाहेर नेले. (Cricket News)

पाकिस्तानने (Pakistan Cricket) दुसऱ्या सराव सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकातील पाचवा चेंडू यॉर्कर टाकून पहिलीच विकेट घेतली. रहमनुल्लाहसाठी हा पहिलाच चेंडू होता. यॉर्कर इतका अचूक होता की, तो खेळून काढू शकला नाही. हा यॉर्कर चेंडू त्याच्या पायावर लागला. पंचांनी त्याला बाद घोषित केले.

शाहीनच्या या यॉर्कर चेंडूने गुरबाज बाद झाला. पण त्याचबरोबर तो जायबंदीही झाला. त्याला पायाला दुखापत झाली. गुरबाज मैदानातच वेदनेने विव्हळू लागला. त्यानंतर लगेच फिजिओ मैदानावर आले. त्याला आपल्या पायावरही उभे राहता येत नव्हते. शेवटी संघ सहकाऱ्याने त्याला पाठीवरून मैदानाबाहेर नेले. रिपोर्टनुसार, गुरबाजला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

शाहीन आफ्रिदी ठरतोय घातक

शाहीन आफ्रिदीनं अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुसरा सलामीवीर हजरतुल्लाह जजई यालाही त्रिफळाचित केले. आफ्रिदीनं ४ षटकांत २९ धावा देत २ विकेट घेतल्या. मात्र, पाकिस्तानचे अन्य गोलंदाज निष्प्रभ ठरले. हारिस रउफ याने दोन विकेट घेतल्या. पण ४ षटकांत त्याने ३४ धावा दिल्या. नसीम शाहने ३८ धावा दिल्या. मोहम्मद वसीम ज्युनिअरने २७ धावा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT