Eng vs USA Saam Tv
Sports

T20 World Cup Semi Final: वर्ल्डकप सेमिफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला; USA ला लोळवून इंग्लंडची धडाक्यात एन्ट्री!

England Reached in ICC T20 World Cup 2024 Semi Final: इंग्लंड संघाने सुपर 8 मध्ये अमेरिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने फक्त 9.4 षटकांत 116 धावांचे लक्ष्य गाठले.

साम टिव्ही ब्युरो

इंग्लंड संघाने सुपर 8 मध्ये अमेरिकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंडने फक्त 9.4 षटकांत 116 धावांचे लक्ष्य गाठले. या विजयानंतर इंग्लंडचा रेन रेट वाढला आहे. याशिवाय सेमिफायन धडक देणारा गट 2 मधील इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे.

इंग्लंड संघाने फक्त 9.4 षटकांत 116 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांपेक्षा अधिक झाला आहे. या विजयानंतर इंग्लंडचा नेट रन रेट +1.992 झाला आहे. जो वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्हीपेक्षा जास्त आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा अमेरिकेला फलंदाजी संधी दिली. अमेरिकन संघाच्या 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही आणि शेवटच्या 4 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. अमेरिकेकडून नितीश कुमारने 30 आणि कोरी अँडरसनने 29 धावांचे योगदान दिलं. मात्र खेळाडूंमध्ये कोणतीही मोठी भागीदारी होऊ शकली नाही. ज्यामुळे यूएसएला फक्त 115 धावा करता आल्या. कर्णधार ॲरॉन जोन्सने 10 धाव केल्या आणि हरमीत सिंगनेही 21 धावा केल्या.

नंतर फलंदाजीसाठी आलेय इंग्लंड संघाने 116 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलर आणि फिलिप सॉल्टने जबरदस्त सुरुवात करून दिली. इंग्लंड संघाच्या फलंदाजांनी तिसऱ्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली आणि पॉवरप्ले षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 60 धावांपर्यंत पोहोचली. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि या सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना 38 चेंडूत 83 धावा केल्या. दरम्यान, हरमीत सिंगच्या एकाच ओव्हरमध्ये त्याने 5 षटकार ठोकले. हरमीतच्या ओव्हरमध्ये त्याने एकूण 32 धावा आल्या. 10व्या षटकात बटलरने व्हॅनच्या चेंडूवर चौकार मारून इंग्लंडचा 10 गडी राखून विजय मिळवून दिला.

दरम्यान, इंग्लंडच्या या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अडचणीत सर्वाधिक वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांपेक्षा खूपच कमी आहे. अशातच वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत झाल्यास ते स्पर्धेतून बाहेर होतील. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट सध्या +0.625 आहे तर वेस्ट इंडिजचा नेट रन रेट +1.814 आहे. यातच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात करो या मरो ची लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Mumbai Crime : मुंबईत २० हून अधिक घरे, शेकडो भक्त; किन्नरांच्या गुरुला अटक, बांग्लादेश कनेक्शन उघड

Maharashtra Live News Update: मंत्री छगन भुजबळ माजी मंत्री धनंजय मुंडे आमदार गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके यांचे मंचावर आगमन.

तेरी मेहरबानियाँ ! मालकाचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कार झाले; निष्ठावान कुत्रा स्मशानभूमीतच राहिला, ९ दिवस...

Facebook Messenger App बंद होणार; Meta कंपनीचा मोठा निर्णय! दुसरा पर्याय काय?

SCROLL FOR NEXT