T20 World Cup: टी 20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला. आयर्लंडने इंग्लंडसमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडच्या संघाने एकवेळ 14.3 षटकांत पाच गडी गमावून 105 धावा केल्या होत्या. संघाला विजयासाठी 27 चेंडूत 53 धावांची गरज होती. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला.
त्यावेळी इंग्लंडचा संघ नियमानुसार 40 धावांनी पिछाडीवर होता. तत्पूर्वी, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वुड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्याने इंग्लंडने आयर्लंडला 157 धावांत गुंडाळले. आयर्लंडचा कर्णधार अँडी बालबर्नीने 47 चेंडूत 62 धावा केल्या, जे त्याचे टी-20 विश्वचषकातील पहिले आणि आठवे अर्धशतक आहे. (Cricket News)
इंग्लंडचे फलंदाज सपशेल फेल
इंग्लंडचे फलंदाज या सामन्यात स्ट्रगल करताना दिसले. कर्णधार जोस बटलर 0 आणि अॅलेक्स हेल्स 7 धावांवर बाद झाले. जोशुआ लिटलने दोघांनाही बाद केले. बेन स्टोक्स ही अवघ्या 6 धावा करुन बाद झाला. 21 चेंडूत 18 धावा करून हॅरी ब्रूक जॉर्ज डॉकरेलचा बळी ठरला. डेव्हिड मलान 37 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. मोईन अली 12 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिला. लियाम लिव्हिंगस्टोन दोन चेंडूत एका धावेवर नाबाद राहिला.
आयर्लंडची सुरुवात चांगली झाली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 12 षटकांत 1 गडी गमावून 102 धावा केल्या होत्या. पण, यानंतर आयर्लंडचा डाव पूर्णपणे कोलमडला आणि पुढील 9 विकेट 55 धावांतच गेल्या. कर्णधार अँड्र्यू बालबर्नी 47 चेंडूत 62 धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले. इंग्लंडकडून मार्क वुड आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 3-3 विकेट्स घेतल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.