India celebrate their dominant win over Pakistan to confirm Super 8 qualification in the T20 World Cup 2026. saam tv
Sports

T20 World Cup 2026 Points Table: टीम इंडिया सुपर-८ मध्ये दाखल; पाकिस्तानचं वर्ल्ड कपमधील भवितव्य धोक्यात!

T20 World Cup Points Table Update: ग्रुप अ मध्ये भारताचा धमाका पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर टीम इंडियानं सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे.

Bharat Jadhav

  • भारताचा पाकिस्तानवर दारूण विजय

  • टीम इंडियाचा सुपर 8 मध्ये प्रवेश

  • टी20 विश्वचषकातील भारताचा आठवा विजय

टी-२० वर्ल्ड कपच्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. या विश्वचषकात भारताने आठवा विजय मिळवलाय. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत १७५ धावा केल्या. कोलंबोच्या कठीण खेळपट्टीवर ही धावसंख्या पाकिस्तानसाठी खूपच मोठी ठरली.

आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीसमोर शरणागती पत्करली. दरम्यान भारताकडून दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ टी२० विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

गट अ मध्ये भारताचे वर्चस्व

भारताने गट अ मध्ये शानदार कामगिरी केली. भारताने सलग तीन सामने जिंकले आहेत. या विजयांसह टीम इंडियाने उत्कृष्ट नेट रन रेटसह सुपर ८ मध्ये प्रवेश केला. दुसरीकडे पाकिस्तानने या टी-२० विश्वचषकात आपला पहिला सामना गमावला आहे. आता या परभवानंतर पाकिस्तानच स्पर्धेतील भवितव्य धोक्यात आलंय.

जर पाकिस्तानने नामिबियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावला तर ते स्पर्धेतून बाहेर पडतील. कारण अमेरिकेने दोन सामने जिंकले आहेत. आणि त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. अमेरिका पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तानची गच्छंती होत ते तिसऱ्या स्थानावर घसरलेत.

भारताने पाकिस्तानला हरवलं

कोलंबोच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानला ६१ धावांनी हरवले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव फक्त ११४ धावांवर संपुष्टात आला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक ३४ चेंडूत ४४ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.

तर सात पाकिस्तानी फलंदाजांना दुहेरी आकडा गाठताच आला नाही. भारताकडून इशान किशनने ४० चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. पांड्या, बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कैसा हराया? टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारतीयांचा जल्लोष, VIDEO

भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

India vs Pakistan: हार्दिकचा कारमाना पाहून तीनवेळा टेबलावर मारला हात; कोच गौतम गंभीरची रिअॅक्शन व्हायरल

Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

Maharashtra Live News Update : शिवभक्तांचे वाहन उलटले; एक ठार, १७ जण जखमी

SCROLL FOR NEXT