रविवारी म्हणजेच उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्डकप २०२६ चा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. यावेळी टीम इंडिया न्यूझीलंडशी भिडणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये भारताने कधीही न्यूझीलंडला हरवलेलं नाही. दोन्ही टीम्समध्ये खेळले गेलेले तिन्ही सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सुपर संडे रोजी होणारा अंतिम सामना भारतासाठी एक महत्त्वाची लढाई आहे.
दोन्ही देशांमध्ये एकूण ३० टी-२० सामने खेळले गेलेत. ज्यामध्ये भारताने १६ सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकलेत. यावेळी तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. या तीन सामन्यांमध्ये भारताने सुपर ओव्हरमध्ये दोन जिंकले आणि एक डीएलएस पद्धतीने बरोबरीत सुटला.
गुरुवारी टीम इंडियाने इंग्लंडच्या टीमचा पराभव करत फायनलमध्ये इंग्लंडचा ७ रन्सने पराभव केला. भारताने ७ विकेट्स गमावू २५३ असा मोठा स्कोर उभारला होता. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनेही ७ विकेट्स गमावून २४६ रन्स केले. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. इतर फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.
इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात वरूण चक्रवर्तीला चांगली कामगिरी करता आली नाही. तर न्यूझीलंडविरुद्धही वरुणची कामगिरी विशेष प्रभावी राहिलेली नाहीये. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्धच्या चार टी-२० सामन्यांमध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याचा सरासरी ३२.७५ आणि इकॉनॉमी रेट ८.१८ आहे. त्यामुळे त्याच्या जागी कुलदीपला संधी मिळू शकते.
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील त्याचा रेकॉर्ड चांगला आहे. त्या ठिकाणी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने आठ विकेट्स घेतल्यात. यावेळी त्याचा सरासरी १४.२५ आणि इकॉनॉमी रेट ८.२५ आहे.
२०२६ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय ओपनर आणि जागतिक क्रमवारीत नंबर १ टी-२० फलंदाज अभिषेक शर्माची कामगिरी अपेक्षेनुसार राहिली नाहीये. सध्याच्या स्पर्धेत त्याची बॅट शांतच राहिली. सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध तो मोठी खेळी करू शकला नाही ज्यामुळे फायनलमध्ये त्याला संधी मिळणार की नाही यावर प्रश्न उपस्थित होतंय.
वानखेडे स्टेडियमवरील सेमीफायनलमध्ये अभिषेक शर्मा ऑफ-स्पिनर विल जॅक्सच्या गोलंदाजीवर फक्त ९ रन्सवर बाद झाला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध ५५ रन्स केले होते. पण त्याचा फॉर्म पुन्हा खराब झाला. या टी-२० वर्ल्डकपमध्ये अभिषेकने सात डावात १२.७१ च्या खराब सरासरीने ८९ रन्स केलेत.
दरम्यान, भारतीय फलंदाजी क्रमातील बदल होणार का याबाबत चर्चा रंगलीये. काही माजी खेळाडूंनी मिडल ऑर्डर स्ट्राँग होण्यासाठी रिंकू सिंगला टीममध्ये समाविष्ट करण्याचा सल्ला दिलाय. तर संजू सॅमसनसोबत ओपनिंगला इशान किशनला पाठवणं योग्य ठरेल. आता सर्वांचं लक्ष अहमदाबादमधील अंतिम सामन्यावर आहे.
भारत आणि न्यूझीलंड हे सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने खेळले होते. त्यानुसार दोन्ही टीम फायनलसाठीच्या प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल करणार नाही, अशी शक्यता आहे.
टिम सेफर्ट, फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, कोल मॅककोंची, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.