T20 World Cup, Hardik Pandya News Update  Saam TV
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडियात मोठी घडामोड; हार्दिक पंड्या पुढच्या सामन्यात खेळणार नाही?

पाकिस्तानविरुद्ध धडाकेबाज कामगिरी करणारा हार्दिक पंड्या पुढच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.

Nandkumar Joshi

T20 World Cup, Hardik Pandya : टी २० वर्ल्डकपमधील टीम इंडियाची सुरुवात झक्कास झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. आता पुढचा सामना नेदरलँडविरुद्ध होणार आहे.

हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाचा (Team India) कसून सराव सुरू आहे. टी २० वर्ल्डकप स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्याआधी सपोर्ट स्टाफनं सरावादरम्यान के. एल. राहुल याच्या जलद गोलंदाजीविरुद्ध फुटवर्कमधील उणिवा दूर करण्यावर भर दिला.

दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी आणि फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करणारा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला सरावादरम्यान विश्रांती देण्यात आली होती. नेदरलँडविरुद्ध टीम इंडियाची लढत येत्या २७ ऑक्टोबरला होणार आहे.

अशा वेळी टीम इंडिया पंड्याला स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांआधी विश्रांती देण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी दीपक हुड्डा याचा खेळवण्याची शक्यता अधिक आहे. हुड्डा हा कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच फिरकी गोलंदाजीही करतो.

सराव सत्रात आर. अश्विन वगळता पाकिस्तानविरुद्ध खेळणाऱ्या सर्वच गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली होती. पंड्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना जवळपास १४० किलोमीटर प्रतितास वेगाने ४ षटके टाकली. तसेच बराच वेळ त्याने मैदानात फलंदाजी केली.

ऑस्ट्रेलियाचे मैदान खूप मोठे आहेत. अशावेळी फलंदाजांना बऱ्याच रन्स या धावून काढाव्या लागतात. भारतीय डावावेळी हार्दिक पंड्याला बराच वेळ त्रास जाणवत असल्याचे दिसून आले होते. नेट सेशन दरम्यान हार्दिक पंड्याला त्रासाबाबत विचारण्यात आले.

मला असं काही जाणवत नाही. याआधी टी-२० सामन्यात मी कधीच इतक्या धावा या धावून काढलेल्या नाहीत. त्यामुळे असे होऊ शकते, असे हार्दिक पंड्या म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT