Rohit Sharma Fitness Update : टी20 विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, मंगळवारी सकाळी आलेल्या एका वृत्ताने सगळ्यांनाच चिंतेत टाकलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला नेटमध्ये सराव करत असताना दुखापत झाली. या वृत्तामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढलं. रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धचा सामना खेळणार की नाही? असा प्रश्न क्रिडाप्रेमींना पडला. (Sports News)
आता रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा याची दुखापत गंभीर नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, तरीही सुद्धा रोहित हा इंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल सामना खेळणार की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
सेमी फायनलमध्ये (T20 world cup) १० नोव्हेंबरला टीम इंडियाचा सामना बलाढ्य इंग्लड संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यांत टीम इंडिया विजयी होईल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र, सामना अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना, रोहित शर्मा याला दुखापत झाली असल्याचं वृत आलं. या वृत्ताने क्रिडाप्रेमींचं टेन्शन वाढवलं.
काय झालं होतं?
सेमीफायनल सामन्याच्या आधी भारतीय खेळाडूंनी वैयक्तीक नेट प्रॅक्टिक्स ठेवली होती. रोहित शर्मा सुद्धा प्रॅक्टिक्स करत होता. यावेळी रोहित शर्माने आर्म पूल करण्याचा प्रयत्न केला आणि १५० पेक्षा अधिक वेगाने फेकला जाणार थ्रो डाउन चेंडू त्याला लागला. चेंडू लागल्या क्षणी रोहितने सराव सोडला आणि तो हाताला आइस पॅक लावताना दिसला.
दरम्यान, रोहितला सराव करताना चेंडू लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओत रोहित शर्मा वेदनेने विव्हळत असल्याचं दिसत होते. तसंच, रोहित नेटच्या जवळ बसला होता आणि लांबून दुसऱ्या खेळाडूंचा सराव पाहत होता. रोहितला दुखापत झाल्याची बातमी समोर येताच भारतीय प्रेक्षकांची चिंता वाढली होती. मात्र, आता रोहित शर्माची दुखापत गंभीर नसल्याचं कळतं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.