T20 WC 2024 Semi Final 1, AFG vs SA 
Sports

T20 WC 2024 AFG vs SA : अररर्रर खतरनाक! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा भेदक मारा; अफगाणिस्तानचा संघ ५६ धावांवर ALL OUT!

T20 WC 2024 Semi Final 1, AFG vs SA : टी-२० विश्वचषक २०२४ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ भिडलेत.

Bharat Jadhav

आज त्रिनिदाद येथे दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात T20 विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जातोय. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणचे पठाण अवघ्या ५६ धावांवर ढेर झालेत. अफगाणिस्तानच्या १० खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाहीये.

या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने आलेत. या सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांनी ३-३ बळी घेतले. तर रबाडा आणि एनरिकने २-२ विकेट घेत अफगाणिस्तानला नांगी टाकण्यास भाग पाडलं. आफ्रिकन गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून भेदक मारा सुरू केला होता. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ११.५ षटकांत गडगडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK मॅच फिक्सिंग होती, पराभवानंतर पाक संघावर पैशांचा पाऊस, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ

Sangli Crime : बनावट आयकर अधिकाऱ्यांकडून दरोडा; डॉक्टरांच्या घरातून कोट्यवधींचे सोने व रोकड लांबविली

Bhandara Rain : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, भंडाऱ्यात मुसळधार पाऊस |VIDEO

Pune News : एकीकडे धो धो पाऊस, दुसरीकडे तारामधून ठिणग्या अन् जाळ; मावळमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT