VIP Mobile Number: जन्म तारीख अन् लकी नंबरला बनवा तुमचा फोन नंबर, किती खर्च येतो?

Priya More

व्हीआयपी मोबाईल नंबर

मोबाईल नंबर आपल्या जन्मतारखेचा असावा, व्हीआयपी असावा, भाग्यवान अंकांचा असावा अशी अनेकांची इच्छा असते. हा नंबर तुम्ही घरबसल्या मिळवू शकता.

VIP Mobile Number | Social Media

जिओ आणि व्हीआय कंपनी

जिओ आणि व्हीआय सारख्या टेलिकॉम कंपन्या व्हीआयपी नंबर निवडण्याची संधी देतात. यासाठी तुमच्या फोनमध्ये मायजिओ ॲप किंवा व्हीआय मोबाईल ॲप असणे आवश्यक आहे.

VIP Mobile Number | Social Media

मॅचिंग नंबर

मायजिओ ॲपच्या होम स्क्रीनवर स्क्रोल करा आणि क्विक लिंक्स निवडा. तिथे 'मॅचिंग नंबर' पर्यायावर क्लिक करा.

VIP Mobile Number | Social Media

फोन नंबर

जर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेशी संबंधित नंबर फोन नंबर म्हणून हवा असेल तर 'व्हीआयपी नंबर शोधत आहात?' या पर्यायावर क्लिक करा.

VIP Mobile Number | Social Media

असा मिळवा व्हीआयपी नंबर

यानंतर तुम्ही तुमचा आवडता ४ ते ८ अंकी पॅटर्न टाका आणि सर्चवर क्लिक करून तुमचा नंबर निवडा आणि बुक करा.

VIP Mobile Number | Social Media

व्हीआय युजर्स

Vi युजर्स देखील अॅपद्वारे स्वतःसाठी VIP नंबर बुक करू शकतात. यासाठी Vi ॲपमधील VIP नंबर पर्यायावर क्लिक करा.

VIP Mobile Number | Social Media

असा मिळवा Vi चा नंबर

स्क्रीनवर दाखवलेल्या मोफत आणि प्रीमियम VIP क्रमांकांच्या यादीमधून तुमच्या पसंतीचा क्रमांक निवडा. तुमचा पोस्टकोड आणि डिलिव्हरीचा पत्ता टाकून ऑर्डर करा.

VIP Mobile Number | Social Media

ऑफलाइन स्टोअर

जिओच्या विशेष गोल्ड कॅटेगरी व्हीआयपी नंबरसाठी तुम्हाला ऑफलाइन स्टोअरमधून एक व्हाउचर खरेदी करावे लागेल ज्याची किंमत १२,००० रुपयांपर्यंत असू शकते.

VIP Mobile Number | Social Media

फॅन्सी नंबर्स

Vi ॲपवर अनेक फॅन्सी नंबर्स मोफत उपलब्ध आहेत. काही विशेष श्रेणीतील नंबर्स ५९० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंतच्या किमतीत तुम्ही मिळवू शकता.

VIP Mobile Number | Social Media

NEXT: Chunyache Pani: १५ दिवस चुन्याचे पाणी प्यायल्याने काय होते?

Chuna Water | Social Media
येथे क्लिक करा...