Priya More
चुन्याचे पाणी शरीरासाठी फायदेशीर असते. सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये गव्हाच्या दाण्याऐवढा चुना टाकून प्यायल्याने अनेक फायदे होतात.
चुन्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चुन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्यदायी फायदे होतात. शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते.
चुन्याचे पाणी प्यायल्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांना चुन्याचे पाणी प्यायला देणे फायदेशीर असते.
चुन्याचे पाणी प्यायल्याने हाडे मजबूत होतात. हाडांच्या वेदना कमी होतात. हाडांशी संबंधित समस्या दूर होतात.
चुन्याचे पाणी प्यायल्याने पोटातील जंतू मरतात. तुम्ही नारळाच्या पाण्यात देखील चुना मिसळून त्याचे सेवन करु शकता.
चुन्याचे पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. अशक्तपणाची समस्या दूर होते.
चुन्याचे पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरातील पचनकार्य सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
चुन्याचे पाणी लिव्हरच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. कावीळीवर चु्न्याचे पाणी खूपच उपयुक्त आहे.
चुन्याचे पाणी प्यायल्यामुळे नखं, केस आणि त्वचाशी संबंधित समस्या दूर होतात.
चुन्याचे पाणी पिताना पाण्यामध्ये चुन्याचे प्रमाण जास्त झाले तर पोटात जळजळ, मळमळ होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टीव्ही याचं समर्थन करत नाही.