virat kohli  yandex
क्रीडा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

Vishal Gangurde

मुंबई : टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवडकर्त्यांनी विराट कोहलीवर विश्वास कायम ठेवला आहे. कोहलीला देखील १५ सदस्यांच्या संघात स्थान दिलं आहे. शिवम दुबेला देखील संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरीकडे केएल राहुल आणि रिंकू सिंहला संघात स्थान मिळालं नाही. भारताच्या टी-२० वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

विराटवर विश्वास कायम

विराट कोहलीवर टी-२० वर्ल्डकपच्या निवडकर्त्यांनी विश्वास कायम ठेवला आहे. विराटच्या स्ट्राइक रेटमुळे संघात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, निवडकर्त्यांनी विराट कोहलीवर विश्वास कायम ठेवलाय. कोहली यंदाच्या आयपीएलच्या हंगामात जोरदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत ५०० हून अधिक धावा ठोकल्या आहेत.

पंत आणि सॅमसनवर दाखवला विश्वास

निवडकर्त्यांनी टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि संजू सॅमसनवर विश्वास दाखवला आहे. ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये दिसत आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन देखील चांगली फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आलं नाही.

शिवम दुबे आणि चहलचं कमबॅक

चेन्नई सुपर किंगकडून खेळणाऱ्या शिवम दुबेवर निवडकर्त्यांनी विश्वास दाखवला आहे. आयपीएलमध्ये दाखवलेल्या कामगिरीचं त्याला फळ मिळालं आहे. तर युजवेंद्र चहल देखील निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यास पात्र ठरला आहे.

केएल राहुलकडे दुर्लक्ष

टी-२० वर्ल्डकपसाठी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघात रिंकू सिंहला स्थान मिळालं नाही. तर रिंकूसोबत केएल राहुल आणि शुभमन गिलला देखील मुख्य संघात स्थान मिळालं नाही. रिंकू आणि शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. तर निवडकर्त्यांनी केएल राहुलकडे दुर्लक्ष केलं आहे.

हार्दिक उपकर्णधार

आयपीएल २०२४ मध्ये टीकेचा धनी होत असलेल्या हार्दिक पंड्याला टी-२० वर्ल्डकप २०२४ संघात उपकर्णधार पद मिळालं आहे. हार्दिक या स्पर्धेत उपकर्णदार पद सांभाळताना दिसेल. तर जसप्रीत बुमराहला यावेळी ही जबाबदारी सोपविण्यात आली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT