भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान सध्या इंग्लंडमध्ये टी-२० ब्लास्ट लीग सुरु आहे. या लीगमध्ये गुरुवारी (१७ जुलै) झालेल्या सामन्यात २४ वर्षीय खेळाडूने तुफानी खेळी करत सर्वांना आश्चर्यचकित केले. विकेटकिपर बॅट्समन असलेल्या जॉर्डन कॉक्सने डावात चौकार आणि षटकार मारत शतकीय खेळी केली. या खेळीमुळे जॉर्डन कॉक्सच्या संघाने, एसेक्सने हॅम्पशायरविरुद्धचा सामना ४ विकेट्सने जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना हॅम्पशायर संघाने २२० धावा करत एसेक्स संघासमोर तगडे आव्हान ठेवले होते. हॅम्पशायरकडून टोबी अल्बर्टने ८४ धावांची दमदार खेळी केली होती. त्याला हिल्टन कार्टराईटची साथ मिळाली. कार्टराईटने २३ चेंडूत ५६ धावा केल्या.पण या दोघांपेक्षा जॉर्डन कॉक्सची खेळी लक्षणीय ठरली. त्याने चौकार-षटकार मारत २२ चेंडूत ११० धावा केल्या.
जॉर्डन कॉक्सने २३१.६७ च्या स्ट्राईक रेटने ६० चेंडूत १३९ धावांची नाबाद खेळी केली. या डावात त्याने ११ षटकार आणि ११ चौकार मारले. याचा अर्थ त्याने २२ चेंडूत ११ चौकारांसह ४४ धावा आणि ११ षटकारांसह ६६ धावा म्हणजेच एकूण ११० धावा पूर्ण केला. त्याच्या या शतकीय खेळीमुळे ४ चेंडू शिल्लक असताना एसेक्स संघाला विजय मिळाला.
२४ वर्षीय जॉर्डन कॉक्सव्यतिरिक्त एसेक्स संघातील इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. संघाचे सलामीवीर मायकेल पेपर २३ धावा आणि पॉल वॉल्टर १३ धावा करुन बाद झाले. त्यानंतर एकट्या जॉर्डनने संघाा विजय मिळवून दिला. टी-२० ब्लास्ट लीगमधील एसेक्स संघाचा हा तिसरा विजय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.