Rohit Sharma  saam Tv
Sports

Rohit Sharm World Record: रोहित शर्माच्या नावे मोठा विक्रम, अनेक दिग्गजांना सोडलं मागे

T20 World Cup: रोहित शर्माने अनेक दिग्गजांना मागे टाकत जागतिक विक्रम केला आणि अव्वल स्थान पटकावले.

साम टिव्ही ब्युरो

T20 World Cup : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ICC T20 विश्वचषकात नवा विक्रम केला आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने इतिहास रचला आहे. सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माने अनेक दिग्गजांना मागे टाकत जागतिक विक्रम केला आणि अव्वल स्थान पटकावले.

2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या विश्वचषकापासून रोहित शर्मा या स्पर्धेत खेळत आहे. सर्व फॉरमॅटमध्ये खेळलेल्या रोहितने केलेला विक्रम मोडणे सोपे नाही. रविवारी मैदानात उतरताच रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप मॅचमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू तिलकरत्ने दिलशानसोबत रोहित संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. (Sports News)

T20 विश्वचषकातील सर्वाधिक सामने

ICC T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत रोहित शर्मा अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत त्याने एकूण 35 सामने खेळले आहेत. याआधी टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम श्रीलंकेच्या दिलशानच्या नावावर होता. यादीत तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचे नाव आहे, ज्याने 34 सामने खेळले आहेत. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीनेही 34 सामने खेळले आहेत. तर या स्पर्धेत खेळत असलेला बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसननेही तेवढेच सामने खेळले आहेत.

T20 विश्वचषकातील सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू

  • रोहित शर्मा (भारत) - 36*

  • तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) - 35

  • ड्वेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) - 34

  • शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - 34

  • शकीब अल हसन (बांगलादेश)- 34*

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT