T20 World Cup Pakistan Team  PCB Twitter
Sports

T-20 World Cup: अख्ख्या पाकिस्तानच्या नजरा टीम इंडियाकडे, पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठी भारताच्या मदतीची गरज

दोन पराभवांसह पाकिस्तान गटात पाचव्या क्रमांकावर आहे.

साम टिव्ही ब्युरो

T20 World Cup : टी 20 विश्वचषक 2022 दिवसेंदिवस अतिशय रोमांचक होत आहे. पाकिस्तानचा संघ सलग दोन सामने पराभूत झाला आहे. नेदरलँड्सविरुद्धचा सामना पाकिस्तानने जिंकला. पण सहज वाटणार विजयही खुप लांबला गेला. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला इतरांवर अवलंबून रहावे लागणार आहे. पाकिस्तानला त्यांचे सर्व सामने जिंकावे लागतील आणि भारतीय संघाच्या विजयावर अवलंबून रहावे लागेल. दोन पराभवांसह पाकिस्तान गटात पाचव्या क्रमांकावर आहे.

तिन्ही सामने जिंकले पाहिजेत

पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी तिन्ही सामने जिंकावे लागतील. नेदरलँड्सशिवाय पाकिस्तानला आता दक्षिण आफ्रिका (3 नोव्हेंबर) आणि बांगलादेश (6 नोव्हेंबर) विरुद्ध खेळायचे आहे. आज नेदरलँड्सविरुद्धचा सामना पाकिस्तानने जिंकला आहे. (Sports News)

पाकिस्तानच्या फलंदाजांची खरी कसोटी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर होत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 130 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेच्या गोलंदाजांपुढे गारद झाला होता. या सामन्यात पाकिस्तानला 1 धावेने पराभव स्वीकारावा लागला होता.

पाकिस्तानला सेमीफायनल गाठण्यासाठीचं समीकरण

सलग दोन सामने गमावल्याने पाकिस्तानचा संघ अत्यंत कमकुवत स्थितीत पोहोचला आहे. मात्र पाकिस्तान अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेश, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. याशिवाय टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही देशांना हरवण्याची प्रार्थनाही पाकिस्तानला करावी लागेल. आणखी एक अट अशी असेल की झिम्बाब्वे भारताकडून हरण्यासोबतच बांगलादेश आणि नेदरलँड यापैकी एकाकडून पराभूत झाला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT