ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा (NZ vs AUS) पराभव करून पहिल्यांदाच टी-ट्वेंटी विश्वचषकाची (T-20 World Cup) ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 172 धावा केल्या होत्या. मिचेल मार्शच्या नाबाद 77 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत 2 गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले. या विजयानंतर संघातील खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
रविवारी 14 नोव्हेंबरला आयसीसीला नवा टी-20 चॅम्पियन मिळाला. ऑस्ट्रेलियाने प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आपले नाव कोरले. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अष्टपैलू मिचेल मार्शने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
विजयानंतर हे दोन्ही खेळाडू विचित्र पद्धतीने सेलिब्रेशन करताना दिसले. जेव्हा वेडने त्याच्या बुटात ड्रिंक प्यायली तेव्हा स्टोइनिस त्याच्या मागे त्याच पद्धतीने विजय साजरा करताना दिसला. टीमच्या ड्रेसिंग रूममधला अशा सेलिब्रेशनचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. जेव्हापासून हा व्हिडीओ समोर आला आहे, तेव्हापासून तो खूप व्हायरल होत आहे. यावर लोक वेगवेगळ्या गोष्टीही बोलत आहेत, पण कांगारू टीम आपल्या विजयाच्या जल्लोषात एवढी मग्न आहे की त्यांना कशाचीच पर्वा नाही.
ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा आयसीसी विजेतेपद पटकावले
आयसीसी पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या संघाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. पाचवेळा एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद पटकावणाऱ्या या संघाने यापूर्वी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये वनडे विश्वचषक तर 2006 आणि 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता या संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून आठव्या ICC ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.