delhi  twitter
Sports

SMAT 2024: टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं! एकाच वेळी ११ खेळाडूंनी केली बॉलिंग

Delhi vs Manipur: पंबाज आणि मणिपूर यांच्यात झालेल्या सामन्यात आगळा वेगळा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Delhi vs Manipur, SMAT 2024: देशात सय्यद मुश्ताक अली २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत दिल्ली विरुद्ध मणिपूर या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात एक आगळा वेगळा रेकॉर्ड झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यापूर्वी टी-२० क्रिकेटमध्ये कधीच असा रेकॉर्ड झाला नव्हता.

टी-२० क्रिकेटमध्ये लागोपाठ विकेट्स गेल्या, की ११ फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी मिळते. पण, ११ गोलंदाजांनी गोलंदाजी केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मात्र असं घडलंय. हा रेकॉर्ड दिल्लीने आपल्या नावावर केला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत आयुष बदोनीकडे दिल्लीच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत देखील आहे. यष्टीरक्षक असून तो गोलंदाजी करताना दिसून आला. कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण ४ षटकं टाकण्याची संधी मिळाली नाही.

कारण सर्व ११ खेळाडू गोलंदाजी करताना दिसून आले. यादरम्यान हर्ष त्यागी, दिग्वेश राठी आणि मयांक रावत यांनी प्रत्येकी ३-३ षटक गोलंदाजी केली. तर अखिल चौधरी, आयुष सिंग आणि आयुष बदोनीने प्रत्येकी २-२ षटक गोलंदाजी केली. तर हिम्मत सिंग, प्रियांश आर्या, अनुज रावत, यश धुल आणि आर्यन राणा यांनी प्रत्येकी १-१ षटक गोलंदाजी केली.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, मणिपूरने २० षटकअखेर १२० धावा केल्या. या सामन्यात मणिपूरला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. कारण ४१ धावसंख्येवर या संघाचे ६ फलंदाज माघारी परतले होते. मणिपूरकडून अहमद शाहने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर उलेनयईने १९ धावा केल्या. त्यानंतर विकेट्सची रांग लागली.

या डावात मणिपूरला १०० धावांचा आकडा देखील गाठता आला नसता. मात्र खालच्या फळीतील फलंदाजांनी थेंबे थेंबे तळं साचवत संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. मात्र गोलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या संघाने कहरच केला. ११ च्या ११ खेळाडू गोलंदाजी करताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT