Shamika Chipkar, Swimmer, World Record Book, Sindhudurg saam tv
Sports

Shamika Chipkar Sets World Record : लाटांशी टक्कर देत बारा वर्षीय शमिकाने अरबी समुद्रात नाेंदविला विश्वविक्रम

लांब पल्याची जलतरणपटू म्हणून शमिकाची शहर व परिसरात ख्याती आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Shamika Chipkar News : समुद्र म्हटले भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळते. विशाल समुद्राशी मस्ती करू नये असे म्हणतात पण याच अरबी समुद्रात शिरून कुडाळच्या बारा वर्षीय मुलीने दहा तास 31 मिनिटे 11 सेकंदात ४० किलोमीटर हे अंतर यशस्वीरित्या पोहून वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये स्थान पटकाविले आहे. तिच्या या यशाची नाेंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया संस्थेने घेतली आहे.

शमिका चीपकर ही कुडाळ (Kudal) शहरातील लक्ष्मी बागेतील रहिवासी आहे. ती कुडाळ हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत आहे. लांब पल्याची जलतरणपटू म्हणून तिची शहर व परिसरात ख्याती आहे.

वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे (Swimming) धडे गिरवले. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील निवती बीच येथील समुद्रात 40 किलोमीटर अंतर कमीत कमी वेळात म्हणजेच दहा तास 31 मिनिट 11 सेकंदात यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आगळा वेगळा विक्रम नुकताच तिने प्रस्थापित केला.

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर हे समाजातील वैशिष्ट्यपूर्ण चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ देण्याचे काम करीत आहेत. तसेच सहकार्य ही करत आहेत. आत्तापर्यंत विविध कार्यक्षेत्रातील प्रत्येक स्तरावरील विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीरुपी हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ काम केलेल्या आणि राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार मिळवलेल्या सुषमा नार्वेकर यांनी केले आहे. शमिकाच्या रेकॉर्डची माहिती मिळताच त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. कुडाळ हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत व रेकॉर्ड ऑफ इंडियाचे विशेष प्रतिनिधी सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांनी शमिकाचा पदक, प्रमाणपत्र व सन्मानपत्र देऊन सन्मान केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शमिका हिने जलतरणाचे फायदे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Maharashtra Live News Update : सांगली-मिरजला पावसाने झोडपले,

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

SCROLL FOR NEXT