swapnil kusale twitter
Sports

Swapnil Kusale Record: मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

Swapnil Kusale Record at Paris Olympics 2024 Rifle Shooting 50m: पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील सहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं आहे. मराठमोळ्या स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल ३ पोझिशन शूटिंग प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. यासह त्याने इतिहास रचला आहे.

स्वप्नील कुसळे हा पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत पदक जिंकणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापू्र्वी मनू भाकरने १० मीटर पिस्तूल शूटिंग प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने १० मीटर पिस्तूल शूटिंग मिश्र प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं.

असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

यापूर्वी कुठल्याच भारतीय खेळाडूला पुरुषांच्या ५० मीटर रायफल ३ प्रोझिशन शुटिंग प्रकारात ऑलिंपिक पदक जिंकता आलं नव्हतं. या प्रकारात ऑलिंपिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय नेमबाज ठरला आहे. यासह ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकणारा महाराष्ट्रातील दुसराच खेळाडू ठरला आहे.

स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारातील फायनलमध्ये ४५१.४ गुणांची कमाई करत कांस्यपदक पटकावलं. हे महाराष्ट्राच्या सुपुत्राने पटकावलेलं दुसरं पदक ठरलं आहे. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत पदक पटकावलं होतं.

यापूर्वी २००४ मध्ये राज्यवर्ध राठोड यांनी भारताला शूटिंगमध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं. त्यांनी अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत हा कारनामा केला होता. त्यानंतर अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं. २०१२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत गगन नारंग आणि विजय कुमार यांनी शूटिंगमध्ये भारताला २ पदकं मिळवून दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT