Suryakumar Yadav saam tv
Sports

Suryakumar Yadav: सूर्यकुमारला डबल धक्का; BCCI नंतर मुंबई इंडिन्यसही साथ सोडणार?

Mumbai Indians: टी-20 संघातून वगळल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या आयपीएल भविष्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई इंडियन्सला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर केकेआर किंवा सीएसकेमध्ये जाण्याच्या शक्यतांबाबत चर्चा रंगू लागली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० सिरीजसाठी वर्ल्डकप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. टीममधून वगळल्यासोबत त्याला त्याचं कर्णधारपदही गमाववं लागलंय. अशातच आता सूर्या आयपीएलची टीम मुंबई इंडियन्समधूनही बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

आता झालेल्या आयपीएलच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच निराशाजनक होती. अशातच सूर्या आता मुंबई सोडणार अशी चर्चा रंगलीये. याचं कारण म्हणजे त्याने त्याने इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलंय.

कोणत्या टीममधून खेळणार सूर्या?

२०२६ च्या इंडियन प्रीमियर लीगसाठी मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला १६.२५ कोटी रुपयांना रिटेन ठेवलं होतं. सूर्या २०१८ पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. जर सूर्यकुमारने मुंबई इंडियन्स सोडले तर तो त्याच्या जुन्या टीममध्ये म्हणजे केकेआरमध्ये परत येऊ शकतो. केकेआर देखील एका कर्णधाराच्या तसंच टॉपच्या फलंदाजाच्या शोधात आहे. केकेआर व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सदेखील सूर्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी प्रयत्न करू शकते.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्याची कामगिरी

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट राहिलीये. त्याने २०११ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. पण त्या सिझनमध्ये तो फक्त एकाच सामन्यात खेळू शकला. त्यानंतर तो केकेआर टीममध्ये सामील झाला आणि २०१८ मध्ये मुंबईत परतला. मुंबईसाठी त्याने आतापर्यंत १२७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना दोन शतकांसह ४,०२० रन्स केलेत. दुसरीकडे, केकेआरसाठी त्याने ६० सामन्यांमध्ये ६८४ रन्स केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT