suryakumar-yadav twitter
Sports

Suryakumar Yadav Statement: हातचा सामना निसटल्यानंतर सूर्या भडकला; या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

India vs Australia 3rd T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ तिसऱ्या टी-२० सामन्यात आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav News In Marathi:

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी -२० सामना गुवाहाटीच्या मैदानावर पार पडला.

या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विनिंग शॉट मारत ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात शतकी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल या सामन्याचा हिरो ठरला. दरम्यान या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने गेम प्लान सांगितला आहे. (Suryakumar Yadav)

हा सामना झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितलं की, भारतीय संघाचा गेम प्लान ग्लेन मॅक्सवेलला लवकरात लवकर बाद करण्याचा होता. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' आमचा गेम प्लान त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा होता. या मैदानावर दवाचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळे २२० धावांचा बचाव करताना गोलंदाजांना काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा संघ कुठेच मागे पडला नाही. मी संघातील खेळाडूंना सांगितलं होतं की, आपण ग्लेन मॅक्सवेलला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. पण, असं झालं नाही. हा वेडेपणा होता.' (IND vs AUS)

तसेच संघातील खेळाडूंबाबत बोलताना तो म्हणाला की, ' अक्षर अनुभवी गोलंदाज आहे. मैदानावर दवाचे प्रमाण अधिक असेल तरीही अनुभवी गोलंदाजाला फलंदाजाला बाद करण्याची संधी असते. जरी तो फिरकी गोलंदाज असेल तरीही. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे.' असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. (Latest sports updates)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १२३ धावांची खेळी केली.

तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३९ धावांची तुफानी खेळी केली. शेवटी तिलक वर्माने आक्रमक खेळी करत ३१ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद २२२ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत ताबडतोड १०४ धावांची खेळी केली. तर ट्रेविस हेडने ३५ आणि कर्णधार मॅथ्यू वेडने नाबाद २८ धावांची खेळी करत संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-१ ने दमदार कमबॅक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट, पुढी तीन तास धो धो कोसळणार

सरकारी काम, सहा महिने थांब... शिक्का पुसला जाणार, KDMC मध्ये राज्यातील पहिला प्रयोग, १५ ऑगस्टपासून सुरू

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर ५५०० रुपयांनी घसरले; १० तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Dnyanda Ramatirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरची पहिली मालिका कोणती?

गुगल मॅपने पुन्हा गंडवलं, कार थेट खाडीत कोसळली, नवी मुंबईतील घटना

SCROLL FOR NEXT