Suryakumar yadav  saam tv
Sports

Ind Vs SL 2nd ODI : सूर्यकुमारला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही स्थान मिळणार नाही? टीम इंडियाने आखली नवी रणनीती

कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग-११ मध्ये बदल करणार का, हे पाहावे लागणार आहे.

Vishal Gangurde

Ind Vs SL 2nd ODI News : टीम इंडिया गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना खेळणार आहे. टीम इंडिया या सामन्यात जिंकण्याच्या निश्चयाने उतरणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला ६७ धावांनी मात दिली. त्यानंतर आता कोलकातामध्ये होणाऱ्या सामन्यावर सर्वांची नजर असणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेइंग-११ मध्ये बदल करणार का, हे पाहावे लागणार आहे.

सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात स्थान मिळालं नव्हतं. सध्या सूर्यकुमार टी-२० फॉरमॅटमध्ये तुफान फॉर्ममध्ये दिसत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप तीन फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजी केली होती, त्यामुळे प्लेइंग-११ मध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.

रोहित-गिल-कोहली यांनी दाखवली तुफान फलंदाजी

कर्णधार रोहित शर्माने ८३ धावा केल्या. मात्र, रोहितला शतक मारता आले नाही. त्यामुळे आगामी सामन्यातही रोहित चांगल्या धावा करेल. तर विराट कोहली लागोपाठ दोन शतक ठोकली आहेत. त्यामुळे त्यांची फलंदाजी जोरात सुरू आहे.

युवा सलामीवीर शुभमन गिलने ६० चेंडूमध्ये ७० धावा कुटल्या. गिलला ईशान जागेवर स्थान दिल्यानंतर खूप टीका झाली होती. मात्र, गिलने चांगल्या धावा कुटल्यामुळे टीकाकारांची बोलती बंद झाली आहे. याचबरोबर चौथ्या स्थानावर उतरणाऱ्या श्रेयस अय्यर देखील चांगली फलंदाजी करताना दिसत आहे.

सूर्याला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी

टीम इंडियाच्या टॉप ३ फलंदाजांकडून चांगली फलंदाजी सुरू आहे. चौथ्या क्रमांकावर उतरणारा श्रेयस अय्यर देखील चांगली फलंदाजी करत आहे. तसेच संघात फलंदाज केएल राहुल यष्टीरक्षकाची जागा भरून काढत आहे. त्यामुळे सूर्याला टीम इंडियात स्थान मिळणे अवघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT