Ind vs Pak T20 World Cup 2026 Colombo Sri Lanka saam tv
Sports

Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध अभिषेक शर्मा खेळणार की नाही? कॅप्टन सूर्यकुमारनं दिली नेमकी माहिती...

abhishek sharma to play india vs pakistan t20 world cup match : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या, रविवारी १५ फेब्रुवारीला कोलंबोत टी २० वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना होत आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला गोड बातमी मिळाली आहे. विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा उद्याच्या सामन्यात खेळणार आहे, अशी माहिती सूर्यकुमार यादव यानं दिल्याचं समजतं.

Nandkumar Joshi

भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की ठस्सन आलीच. हे दोन्ही संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी. ही लढत म्हणजे जगातील क्रिकेट चाहत्यांसाठी जणू पर्वणीच असते. वर्ल्डकपसारख्या स्पर्धांमध्ये तर भारतानं पाकिस्तानला अनेकदा धूळ चारली आहे. मागील आशिया कपमध्ये तर भारतीय संघाच्या धुरंधरांनी जेव्हा जेव्हा पाकिस्तानचा संघ समोर आला, तेव्हा तेव्हा धोबीपछाड दिला. आता टी २० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येत आहेत. कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्याआधी भारतीय संघासाठी गुड न्यूज आली आहे. आजारी असल्यानं नामिबियाविरुद्ध न खेळणारा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत खेळणार असल्याचं निश्चित झाल्याचं समजतंय.

कोलंबोत रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात सलामीवीर आणि भल्याभल्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा खेळणार असल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितल्याचे समजते. वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा खेळला नव्हता. पोटातील संसर्गामुळं तो संघाबाहेर होता. त्याला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. संघ व्यवस्थापनाने त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्येही समाविष्ट केले नव्हते. दुसऱ्या सामन्यात त्याला पूर्णपणे विश्रांती दिली होती.

कोलंबोत पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळणार की नाही याबाबत प्रचंड उत्सुकता होती. भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचल्यानंतर सूर्यकुमार यादवनं अभिषेक शर्मा खेळणार की नाही याबाबत महत्वाची माहिती दिल्याचे कळते. अभिषेक शर्मा हा उद्याच्या सामन्यात नक्कीच खेळेल, असं सूर्यकुमारने म्हटलं आहे. त्यामुळे अभिषेक शर्मा हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीला येईल, यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालं आहे.

जर पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटत असेल की अभिषेक शर्मानं या सामन्यात खेळावं, तर तो नक्कीच खेळणार आहे. उद्याच्या सामन्यात तो खेळताना दिसेल, असे सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा यानं माध्यमांशी संवाद साधताना अभिषेक शर्माबाबत वक्तव्य केलं होतं. रविवारी अत्यंत महत्वाच्या अशा सामन्यात अभिषेक शर्मानं खेळावं असं आम्हाला वाटतं, असं सलमान म्हणाला होता. अभिषेक हा चांगला खेळाडू आहे. उद्याच्या सामन्यात त्याने सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध खेळायला हवं असं आम्हाला वाटतं. तो तंदुरुस्त होईल आणि उद्याच्या सामन्यात खेळेल अशी अपेक्षा आहे, असंही तो म्हणाला होता. या विधानातून पाकिस्तानच्या कर्णधारानं भारतीय संघाला डिवचले होते. एकप्रकारे आव्हान दिले होते. ते आव्हान आता सूर्यकुमार यादवने स्वीकारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हातनुर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीमध्ये १७,०२२ क्युसेक

Mulshi Waterfall : ५ ते १० मिनिटांच्या ट्रेकनंतर दिसतो 'हा' धबधबा, मुळशीजवळ लपलंय सुंदर ठिकाण

Famous Actor : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्याला चावला विषारी किडा; रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Pune Traffic Change: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! आज शहरातील प्रमुख रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Rain Alert : आजही मुसळधार पाऊस! पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट; मुंबईत पावसाची काय स्थिती? वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT