Suryakumar yadav caught eating in dogout in india vs australia funny reaction went viral after cameraman shows him on big screen  Instagram
Sports

Funny Cricket Video: कॅमेरामॅन जल्दी फोकस करो..मोठ्या स्क्रीनवर स्वत:ला पाहुन सूर्याचा घासच अडकला!मजेशीर VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Funny Video: सूर्यकुमार यादवचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Funny Video:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव हा मिस्टर ३६० म्हणून ओळखला जातो. मैदानावर असताना तो चौफेर फटकेबाजी करून क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन करत असतो.तर मैदानाबाहेर असताना तो आपल्या मजेशीर कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे तो डगआऊटमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होता.

दरम्यान सामन्याचा आनंद घेत असताना तो काहीतरी खात होता. नेमकी त्याचवेळी कॅमऱ्याची नजर पडते. आपण मोठ्या स्क्रीनवर दिसतोय हे कळताच तो मजेशीर रिअॅक्शन देताना दिसून आला आहे. या मजेशीर व्हिडिओवर नेटकरी देखील भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे. (Latest sports updates)

भारताचा जोरदार विजय..

चेन्नईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघातील गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा १९९ धावांवर फडशा पाडला.

दरम्यान या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार अर्धशतकं झळकावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

SCROLL FOR NEXT