suryakumar yadav twitter
Sports

Surykumar Yadav Dance Video: जल्लोष वर्ल्डकप विजयाचा! मायदेशी परतताच सूर्याचा क्रिकेट फॅन्ससोबत भन्नाट डान्स- VIDEO

Suryakumar Yadav Dance: भारतात परतल्यानंतर खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. दरम्यान सूर्यकुमार यादव डान्स करताना दिसून आला आहे.

Ankush Dhavre

टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ ४ जुलै रोजी भारतात दाखल झाला आहे. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून भारतात आल्यानंतर क्रिकेट फॅन्स जोरदार जल्लोष करताना दिसून आले आहेत. सकाळी ६ वाजता एअर इंडियाच्या स्पेशल चार्टर्ड विमानाने भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर सर्व खेळाडू दिल्लीतील ICT Maurya हॉटेलमध्ये जाण्यासाठी रवाना झाले. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. दरम्यान सूर्यकुमार यादवचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नसली तरीदेखील त्याने फायनलमध्ये टिपलेला झेल हा सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं.

भारतीय संघाच्या २ बस ICT Maurya हॉटेलमध्ये दाखल झाल्या त्यावेळी संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील खेळाडू हॉटेलमध्ये जात असताना, खेळाडू आणि फॅन्स डान्स करताना दिसून आले. सूर्यकुमार यादवने फॅन्ससोबत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. त्याचा भांगडा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीाडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

रोहितनेही केला डान्स

दिल्लीत आल्यानंतर रोहितनेही फॅन्ससोबत ठेका धरला. रोहितचाही भांगडा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिल्ली विमानतळावरुन बाहेर येताना रोहितने फॅन्सला ट्रॉफी दाखवली. ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मुंबईत विजयी रॅली

भारतीय संघातील खेळाडू दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता भारतीय संघ मुंबईत दाखल होणार आहे. ५ वाजता मुंबईतील नरीमन पॉईंटपासून ते मरीन ड्राईव्हपर्यंत ओपन बसमध्ये विजयी परेड काढली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

शिंदेंच्या आमदाराची गुंडगिरी कधी थांबणार? छत्रपती शिवरायांचा आदर करताना जीभ घसरली, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Crime: खरातनंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूचं कांड, विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

Shocking : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर अपहरण करून डांबून ठेवलं; लग्न करण्यासाठी तरुणाचं संतापजनक कृत्य

Mumbai Metro 5A: आनंदाची बातमी! लोकलच्या गर्दीतून सुटका होणार, उल्हासनगरपर्यंत धावणार 5A मेट्रो; कधीपर्यंत होणार सुरू?

SCROLL FOR NEXT