suryakumar yadav yandex
Sports

माफ करा.. Suryakumar Yadav ला मागावी लागली माफी, नेमकं काय घडलं?

Suryakumar Yadav Instagram Story: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत माफी मागावी लागली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Apologies: भारतीय संघाला आयसीसी टी- २० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. फायनलमध्ये तो फलंदाजीत हवी तशी कामगिरी करु शकला नव्हता. मात्र सीमारेषेवर त्याने भन्नाट कॅच पकडून भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं होतं. दरम्यान सूर्यकुमार यादव आता बुची बाबू स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी त्याने फॅन्सची माफी मागीतली आहे.

सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) भारतीय टी-२० संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंकेला ३-० ने धूळ चारल्यानंतर आता तो मुंबई संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत श्रेयस अय्यरही खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान काही दिवस विश्रांतीवर असताना, सूर्यकुमार यादवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने फॅन्सची माफी मागितली आहे.

स्टोरी शेअर करत मागितली माफी

सूर्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जिममधला एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. ज्यात तो शॉर्ट्समध्ये असल्याचं दिसून येत आहे. या फोटोवर कॅप्शन देत त्याने,'कपड्यांसाठी माफ करा.. या गोष्टीसाठी तर वेळच वेळ आहे.'

suryakumar yadav

बुची बाबू स्पर्धेत झळकणार

बुची बाबू क्रिकेट स्पर्धा ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा आहे. चार दिवसीय फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघातील स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहे. दरम्यान सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरसाठी ही उत्तम संधी असणार आहे. हे दोघेही कसोटी संघातून बाहेर आहे. त्यामुळे या दोघांनाही स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hans Mahapurush Rajyog: 100 वर्षांनी दिवाळीला गुरु बनवणार हंस राजयोग; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार नफा

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

SCROLL FOR NEXT