Team India Playing XI Prediction  BCCI/Twitter
क्रीडा

Ind Vs Aus 2nd Test : सूर्यकुमार की अय्यर, रोहित शर्मा कुणाला संधी देणार? टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

Nandkumar Joshi

Ind Vs Aus 2nd Test, Team India Playing XI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना उद्या, शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) होणार आहे. दिल्ली येथील अरूण जेटली स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाईल.

भारतानं नागपूर कसोटीत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभूत केलं होतं. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करण्याचे लक्ष्य रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचं असणार आहे. हा दुसरा सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार आहे. (Cricket News Update)

श्रेयस अय्यरला संधी मिळणार?

दुसऱ्या कसोटी सामन्याआधी सर्वांच्या नजरा या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनकडे असणार आहे. श्रेयस अय्यर हा संघात परतला आहे. आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जर श्रेयस अय्यरला ११ खेळाडूंमध्ये संधी मिळाली तर, सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागणार आहे. सूर्यकुमारने नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. मात्र, सूर्यकुमार चमकदार कामगिरी करू शकला नाही.

के. एल. राहुलकडून अपेक्षा

पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि केएस भरत हे अपेक्षित कामगिरी करू शकले नव्हते. आता दुसऱ्या कसोटीत या दोघांवर दबाव असणार आहे. दुसरीकडे, शुभमन गिल आणि इशान किशन हे दोघे वेटिंगवर आहेत.

विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून धावांचा रतीब घालणाऱ्या शुभमन गिलला पहिल्या सामन्यात संधी दिली नव्हती. त्यामुळं टीम व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. जर केएल राहुल दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला तर, तिसऱ्या कसोटीत कदाचित राहुलला बाहेर बसावे लागू शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT