surya kumar yadav becomes icc mens t20i player of the year 2022 SAAM TV
Sports

Surya Kumar Yadav: सूर्यकुमार जगात भारी! पटकावला सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार

Surya Kumar Yadav: आयसीसीने 2022 चा सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 क्रिकेटर म्हणून सूर्यकुमारची निवड केली आहे. यानंतर बीसीसीआयने ट्वीट करून सूर्यकुमारचे अभिनंदन केले आहे.

Chandrakant Jagtap

Surya Kumar Yadav: भारताचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोहवला गेला आहे. आयसीसीने (ICC) 2022 चा सर्वोत्कृष्ट पुरुष टी-20 क्रिकेटर (ICC RANKING) म्हणून सूर्यकुमारची निवड केली आहे. यानंतर बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करून सूर्यकुमारचे अभिनंदन केले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ताहिला मॅकग्राला 2022 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला आहे.

सूर्यकुमारने 2022 मध्ये 31 टी-20 सामन्यांमध्ये 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. एका वर्षात टी-20 मध्ये एक हजाराहून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून 68 षटकार निघाले. त्यामुळे सूर्यकुमार एका वर्षात टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. दरम्यान गेल्या वर्षी त्याने दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली होती.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. या स्पर्धेदरम्यान त्याने सहा डावांत 60 च्या सरासरीसह तीन अर्धशतके झळकावली होती. एवढंच नाही तर या काळात त्याचा स्ट्राइक रेट 189.68 होता. गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर टी-२०मध्ये सूर्यकुमारने पहिले शतक झळकावले होते. त्याने 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती.

टी-20 विश्वचषकादरम्यानच सूर्यकुमार आयसीसी टी20 पुरुष फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता. या टी-20 विश्वचषकानंतर लगेचच न्यूझीलंड दौऱ्यावर असताना सूर्याने या फॉरमॅटमध्ये आपले दुसरे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. त्याच्या कामगिरीमुळे आयसीसीने त्याला 'आयसीसी टी-२० पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT