SRH vs LSG Saam Tv
Sports

IPL SRH vs LSG: लखनौ संघाचा 'रॉयल' विजय; हैदराबादमध्येच SRHला दाखवले तारे

SRH vs LSG: प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 9 गडी गमावून 190 धावा केल्या. मात्र लखनौ संघाने 5 विकेट राखत विजय मिळवला.

Bharat Jadhav

आपल्या तुफानी फलंदाजीने राजस्थानच्या संघाला घाम फोडणाऱ्या सनराझजर्स हैदराबादला आज पराभवाची चव चाखावी लागली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये हाय व्हॉल्टेज सामना झाला. हैदराबादने दिलेल्या 191 धावांचे आव्हान लखनौने 5 विकेट राखत पार केलं.

हैदराबादच्या संघाने दिलेल्या आव्हान लखनौ सुपर जायंट्सने 23 चेंडू शिल्लक ठेवत पार केलं. निकोलस पूरन, मिचेल मार्श आणि शार्दुल ठाकूर हे एलएसजीच्या विजयाचे मोठे हिरो ठरले. निकोलस पूरन आणि मिचेल मार्शच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचा 5 विकेट्सने पराभव झाला. पूरनने 26 चेंडूत 70 धावा केल्या. त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्याशिवाय मिचेल मार्शनेही जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 31 चेंडूत 52 धावा केल्या. आयपीएल 2025 मधील मार्चचे हे सलग दुसरे अर्धशतक होते.

शार्दूलने हैदराबादच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं

लखनौच्या विजयाचा पाया रचला तर म्हणजे शार्दूल ठाकूरने. त्याने 4 विकेट्स घेत हैदराबादच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आयपीएलचं लिलावात शार्दुल ठाकूरला कोणत्याच संघाच्या मालकाने खरेदी केले नव्हते. मोहसीन खानच्या जागी एलएसजी संघात त्याला घेण्यात आले. या संधीचं त्याने सुवर्ण करून दिलं. आपण महत्त्वाचे खेळाडू आहोत हे त्याने लखनौसह इतर संघाच्या मालकांना त्याने दाखवून दिले. आजच्या सामन्यात त्याने एकूण 4 विकेट घेतल्या.

ऋषभ पंत फ्लॉप, अब्दुल समद ठरला 'सायलेंट हिरो'

IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत शून्य धावांवर बाद झाला. यावेळी त्याला साधं खाते उघडता आले नाही. SRH विरुद्धच्या सामन्यात पंतला 15 चेंडूत केवळ 15 धावा करता आल्या. पंतची विकेट पडल्याने हैदराबादला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली, पण अब्दुल समदने मात्र त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फेरलं. अब्दुल समदने अखेरच्या क्षणी 8 चेंडूत 22 धावांची छोटी खेळी खेळत लखनौ सुपर जायंट्सला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट; मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये होणार बँक खात्यात जमा? महत्वाची माहिती समोर

आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT